25 November 2017

News Flash

या फोटोतील आघाडीच्या मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

मराठी चित्रपटसृष्टीतील आताच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते.

मुंबई | Updated: September 12, 2017 10:40 AM

प्रिया बापट आणि तिची बहिण

बालपणीच्या आठवणी प्रत्येकासाठी खूप खास असतात. मोठं झाल्यावर आपल्याला बालपणातील गमती-जमती आठवतात आणि नकळत चेहऱ्यावर हसू उमटते. त्यामुळे जुने फोटो पाहिल्यावर काही क्षणांसाठी का होईना आपण जुन्या आठवणींमधून रमून जातो. अशाच काही जुन्या आठवणींना तुमच्या लाडक्या अभिनेत्रीने उजाळा दिलाय.

वाचा : PHOTOS संभाजींच्या भूमिकेत दिसणार हा मराठी अभिनेता

‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅपी जर्नी’, ‘टाइमपास २’, ‘वजनदार’ यांसारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री प्रिया बापटने बालपणातील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. प्रिया आणि तिची बहिण या फोटोत दिसत असून, तिने याला एक सुंदर कॅप्शनही दिलीये. तिने लिहिलंय की, ‘आपल्या दोघींमध्ये किती वेळा भांडणं झाली आणि काही विषयांवर आपल्यामध्ये मतभेदही होते तरीही आपण अजूनही एकत्र आहोत. तू मला फॅशन कशी करायची ते शिकवलंस आणि भांडायलाही शिकवलं. मला इंग्रजी शिकवणारी तू पहिली शिक्षिका. तूच माझी पहिली हिरोसुद्धा आहेस.’

वाचा : ‘सीपीएल’वरुन सोशल मीडियावर प्रिती झिंटा ट्रोल!

दोन्ही बहिणींनी यात फ्रॉक घातलेले असून, डोळ्यांवर काळा गॉगल लावलेला दिसतोय. यावरून, प्रियाला लहानपणापासूनच फॅशनची आवड असल्याचे दिसून येते. पण, या फोटोमधील प्रिया कोणती हे तुम्ही ओळखलंत का? खरंतर फोटोतील प्रियाला ओळखणं थोडसं कठीणच आहे. मात्र चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क लावले असून, निळ्या रंगाचा फ्रॉक घातलेली लहान मुलगी म्हणजेच प्रिया असल्याचे अनेकांनी म्हटलेय.

First Published on September 12, 2017 10:40 am

Web Title: priya bapat shared childhood picture with her sister