News Flash

प्रिया बापट लवकरच देणार ‘गुड न्यूज’

प्रियाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

priya bapat and umesh kamat
प्रिया बापट, उमेश कामत

अवखळ ती आणि शांत तो.. स्वभाव, वागण्याबिगण्याच्या बाबतीत दोन टोकांवर असलेले ते दोघं. त्यांचं प्रेम, त्यांचं लग्न, त्यांचं नातं हे सगळंच मराठी सिने, नाट्य, टीव्ही प्रेक्षकांचं कुतुहल वाढवणारं. हे दोघं म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत. प्रिया सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगत असते. अशीच एक गोड बातमी तिने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे.

उमेशसोबतचा फोटो शेअर करत प्रियाने कॅप्शनमध्ये ‘एक गोड बातमी आहे’ असं लिहिलं. क्षणार्धातच त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. प्रिया आणि उमेशच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चा या पोस्टमुळे सुरू झाल्या आहेत.

सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रिया- उमेशने लग्न केलं. ही जोडी लवकरच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. पण जवळपास ४ वर्षांनंतर ही जोडी एकत्र येणार असल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 11:24 am

Web Title: priya bapat shares picture with husband umesh kamat and hints about good news
Next Stories
1 सारा-सुशांतच्या ‘केदारनाथ’विरोधात गुजरात हायकोर्टात याचिका
2 या पाच कारणांसाठी पाहावा रजनीकांत-अक्षय कुमारचा 2.0
3 #2Point0FromToday : बॉक्स ऑफीस ‘रजनी’मय; ‘2.0’ नव्या विक्रमांसाठी सज्ज
Just Now!
X