News Flash

प्रिया बेर्डे दुहेरी भूमिकेत!

एखाद्या कलाकारासाठी ‘दुहेरी भूमिका’ अर्थातच ‘डबल रोल’ हे नेहमीचे आव्हानात्मक असते.

स्टार प्रवाहवरील ‘प्रीती परी तुजवरती’ मालिकेत प्रवेश

एखाद्या कलाकारासाठी ‘दुहेरी भूमिका’ अर्थातच ‘डबल रोल’ हे नेहमीचे आव्हानात्मक असते. कलाकारही अशा भूमिकेच्या शोधात असतो. मराठी किंवा हिंदूी चित्रपटातून अनेक कलाकारांनी ‘दुहेरी भूमिका’ केल्या आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकेतही आता ‘दुहेरी भूमिका’या प्रकाराने प्रवेश केला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रीती परी तुजवरती’या मालिकेत आता अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा ‘दुहेरी भूमिके’त प्रवेश होणार आहे.
अभिनेते संजीवकुमार यांनी ‘नया दिन नई रात’ या चित्रपटात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल नऊ भूमिका केल्या होत्या. दिग्गजांपासून ते अगदी नव्या कलाकारांनीही आपापल्या पद्धतीने ‘दुहेरी भूमिके’त रंग भरला आहे. प्रेक्षकांकडूनही कलाकारांच्या या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मराठी किंवा हिंदी चित्रपटांमधून जेवढय़ा मोठय़ा प्रमाणात ‘दुहेरी भूमिका’ येऊन गेल्या त्या तुलनेत दूरचित्रवाहिन्यांवर हा प्रयोग अपवादात्मकच म्हणावा लागेल. स्टार प्रवाहवरील ‘प्रीती परी तुजवरती’ ही मालिका प्रीती आणि परी या जुळ्या बहिणींच्या जीवनावर आधारित आहे. आता या मालिकेत प्रिया बेर्डे यांच्या रूपाने आणखी ‘दुहेरी भूमिके’चा प्रवेश होत आहे. प्रिया बेर्डे या मालिकेत ‘शर्मिला’ आणि ‘ऊर्मिला’या जुळ्या बहिणींच्या भूमिकेत आहेत. मालिकेत शर्मिला ही साहिलची आई तर ऊर्मिला हा साहिलची मावशी आहे. शर्मिला शांत, सुस्वभावी आणि भोळ्या स्वभावाची तर ऊर्मिला स्वार्थी वृत्तीची दाखविण्यात आली आहे.
परी तिच्या सासरी या दोघींशी कशी जुळवून घेते आणि यातून काय काय गोष्टी घडतात ते आता मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 1:23 am

Web Title: priya in double roll
Next Stories
1 फ्लॅशबॅक : जेव्हा यशजींच्या गणिताचे ‘फासले’ चुकले
2 ‘स्पेक्टर’मधील चुंबनदृश्याला नियमांनुसार कात्री
3 नव्यांच्या सुरात सूर मिसळून काम करायला आवडते – जॉनी लिव्हर
Just Now!
X