News Flash

‘सासरे फक्त म्हणायला, तो मला बाबा पेक्षाही जवळचा’, श्रीकांत मोघेंच्या आठवणीत प्रिया भावूक

नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांचे ६ मार्च रोजी निधन झाले

रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांचे ६ मार्च रोजी निधन झाले. वयाच्या ९१व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. आता त्यांची सून प्रिया मराठे त्यांच्या आठवणीत भावूक झाली असून तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने “सासरे फक्त म्हणायला होता, तो मला बाबा पेक्षाही जवळचा” असे म्हटले आहे.

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सासरे श्रीकांत मोघे यांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, “माझा बाबा! इतकं प्रेम, माझा नवरा सोडल्यास, क्वचितच कोणी माझ्यावर केल असेल.. ‘सासरे’ फक्त म्हणायला, होता तो मला बाबा पेक्षाही जवळचा. ‘माझं पीयूडं’, ‘माझं लाडकं’ अशी हाक मारत दोन्ही हात पसरून, मला मिठीत घ्यायचा. प्रयोग संपवून आले असले की ‘आज किती बुकिंग होतं, प्रयोग कसा झाला, पुढचा कुठे आहे’ असे सगळे प्रश्न विचारायचा. बाबा आणि मुलाचं हे असं नातं ही मी पहिल्यांदाच पाहिलं. शंतनु बाबाचे गालगुच्चे घ्यायचा, त्याला प्रेमानी अक्षरशः चुर्गळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायचं” असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

पुढे ती म्हणाली, “गेली काही वर्ष तो व्हील चेअर वर होता पण तरी त्याच्या चेहेऱ्यावर मी कधीच, एका क्षणासाठी सुद्धा, उदासीनता नाही पाहिली, उलट आम्हाला लाजवेल इतका उत्साहच कायम पहिला. ‘मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे’ हे धोरण मानून कशातच तो फार अडकला नाही. हा वाहणारा प्रेमाचा धबधबा थांबला.. पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्याचं प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्याचा ज्वलंत अभिनय कायमच जिवंत राहील.” सध्या प्रियाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 7:32 pm

Web Title: priya marathe emotional post shrikant moghe death avb 95
Next Stories
1 ‘दृष्टांत’! मराठीतील अनोखा चित्रपट येणार भेटीला; सर्व कलाकार दृष्टिहीन
2 लस घेताना अनुपम खेर यांच नामस्मरण, तर नीना गुप्तांची ‘मम्मी’ला साद
3 बाळंतपणानंतर करीनामध्ये झालेला बदल पाहून तु्म्हीही चकीत व्हाल!
Just Now!
X