28 January 2021

News Flash

टेलिव्हिजनवरील एका आईची इमेज ही बदलली पाहिजे – प्रिया मराठे

प्रिया ही ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये नचिकेतच्या आईची भूमिका साकारत आहे.

अभिनेत्री प्रिया मराठे ही नुकतीच झी युवावरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रिया ही नचिकेतच्या आईच्या इराच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसत आहे. प्रियाला मालिकेत पाहून चाहत्यांना आनंद झाल आहे. या भूमिकेविषयी बोलताना प्रियाने ‘टेलिव्हिजवरील आईची इमेज ही बदलली पाहिजे’ असे म्हटले आहे.

‘भूमिका स्वीकारताना ती भूमिका काय आणि किती महत्वाची आहे यांच्याकडे माझे लक्ष असते. जर भूमिका खूप ताकदवर असेल तर व्यक्तिरेखेचं वय माझ्यासाठी महत्वाचं नसतं. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत मी साकारत असलेली इराची भूमिका मालिकेत खूप अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे आणि या भूमिकेबद्दलची हीच गोष्ट मला जास्त आवडली’ असे प्रिया म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘मला स्वतःला असं वाटतं की टेलिव्हिजनवरील एका आईची इमेज ही बदलली पाहिजे. माझ्या वयाच्या असलेल्या आई जेव्हा मी खऱ्या आयुष्यात पाहते तर त्या मॉडर्न असतात, मॉडर्न कपडे घालतात, त्यांना सगळं ठाऊक असतं, त्यांचं वागणं फारसं खूप मोठ्या माणसांसारखं नसतं, त्यांना बघून त्या २० वर्षाच्या मुलाची आई वाटत नाहीत आणि अशीच आई मी पडद्यावर साकारतेय.’

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतील नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली आहे. नुकतंच या मालिकेत नचिकेतची आई, इरा म्हणजेच अभिनेत्री प्रिया मराठे हिची धमाकेदार एण्ट्री झाली. पुण्यात लहानाची मोठी झालेली इरा लग्न करून ऑस्ट्रेलियाला गेली आणि गेली २५ वर्ष ती तिकडेच राहते आहे. नचिकेतवर १० लाखांचे कर्ज आहे त्यामुळे त्याला मदत करण्यासाठी ती इकडे आली आहे. ती विचाराने अगदी मॉडर्न आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 6:46 pm

Web Title: priya marathe talks about her new role avb 95
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांनी केली रिटायरमेंटची घोषणा? म्हणाले, “मी सर्वांची माफी मागतो पण…”
2 चित्रपटासाठी गर्दी करणं चाहत्यांना पडलं भारी; संतापलेल्या प्रशासनानं केली पोलीस तक्रार
3 टायगर श्रॉफचा डान्स व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात का?
Just Now!
X