ओमर लुलू दिग्दर्शित ‘उरु अदार लव्ह’ या मल्य़ाळम चित्रपटातील अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या नजरेचे तीर चालवत अनेकांनाच वेडं करुन सोडलं. ‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्यात तिने केलेली भुवयांची हालचाल, नजरेचा कटाक्ष, डोळ्यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे साधलेला संवाद या तिच्या सा-या अदांनी प्रेक्षक घायाळ झाले होते. आता याच प्रियाने पुन्हा एक व्हिडिओ अपलोड करत आपल्या चाहत्यांना घायाळ करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रियाने खूप कमी कालावधीत लोकप्रियतेची उंची गाठली आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या या नॅशनल क्रशने पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या प्रियाने ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातील ‘मेरे सैय्या जी से आज मैने ब्रेकअप कर लिया’ या गाण्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये ती रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याचे लिप सिंकिंग करताना दिसते. या व्हिडिओतही प्रियांच्या डोळ्यांनी पुन्हा एकदा आपली जादू केल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रियाने हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही काळातच लाखो युजर्सनी तो पाहिल्याचे आणि त्याला लाइक केल्याचे दिसून आले. यापूर्वीही प्रियाच्य़ा गाण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रिया अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असून, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली असंच म्हणावं लागेल. या चित्रपटात प्रियासोबतच सियाध शाजान, रोशन अब्दुल रहूफ, नूरीन शरीफ, दिलरुबा हे कलाकारही झळकत आहेत.

Cute or not ?___________________________________________________ DM US FOR PROMOTING or messages☝ ___________________________________________________ Follow for more updates✓ @dance_with_talent @bollywoodfun360 @swagtalent360 @bollywoodfun360photos ____________________________________ Watch dance videos on youtube link is bio subscribe us _____________________________________ Follow for more @bollywoodfun360 @bollywoodfun360 @bollywoodfun360 @bollywoodfun360 _______________________________________ ______________________________________ #priyankachopra#viratkohli#deepikapadukone#anushkasharma#katrinakaif#akshaykumar#shahidkappor#sharaddhakapoor#aliabhatt#jacquelinef#varundhawan#ranveersingh#salmankhan#hrithikroshan#parineetichopra#dishapatani#tigershorff#sonamkapoor#kapilsharma#sunnyleone#johnabraham

A post shared by bollywood acting singing dance (@bollywoodfun360) on