News Flash

प्रिया वारियरच्या त्या व्हायरल व्हिडिओमुळे घेतला हा मोठा निर्णय; दिग्दर्शकाचा खुलासा

'ओरू अदार लव्ह'चे दिग्दर्शक ओमर लुलू यांनी व्यक्त केली खंत

Priya Varrier
प्रिया वारियर

चित्रपटातील गाण्याचा एक व्हि़डिओ व्हायरल झाला आणि ती रातोरात स्टार झाली. ‘नॅशनल क्रश’ म्हणून ती ओळखली जाऊ लागली. ती म्हणजे मल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’ चित्रपटाची मुख्य अभिनेत्री प्रिया वारियर. पण तुम्हाला माहित आहे का, सुरुवातीला प्रिया या चित्रपटात मुख्य नाही तर सहअभिनेत्रीच्या भूमिकेत होती. बसला ना आश्चर्याचा धक्का? चित्रपटाच्या दिग्दर्शकाने नुकताच यासंदर्भातला खुलासा केला आहे.

‘ओरू अदार लव्ह’चे दिग्दर्शक ओमर लुलू याविषयी म्हणाले, ‘प्रियाचा डोळा मारतानाचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. व्हिडिओत प्रियाच्या अभिनयाची फक्त एक झलक होती, त्यामुळे प्रेक्षकांना पूर्ण चित्रपटाची उत्सुकता वाटू लागली होती. चित्रपट आणखी दमदार व्हावा, त्याची कथा उत्तम व्हावी असं मला वाटलं. त्याबद्दल बोलण्यासाठी मी निर्मात्यांकडे गेलो. पण त्यांनी अचानक प्रियाला मुख्य अभिनेत्री करण्यास सांगितले. चित्रपटात प्रियाला केंद्रस्थानी ठेवून कथासुद्धा बदलण्याचे फर्मान निर्मात्यांनी सोडले. आधी चित्रपटाची कथा वेगळी होती. पण प्रियासाठी पूर्ण संकल्पनाच बदलली गेली.’

चित्रपटात प्रियाच्या जागी नूरिन शरीफ ही अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार होती. पण निर्मात्यांच्या अटीमुळे तिच्या भूमिकेला कमी महत्त्व देण्यात आल्याचंही दिग्दर्शकांनी सांगितलं. नूरिन ही प्रियापेक्षा चांगली अभिनेत्री असल्याचंही त्यांनी म्हटलं. नूरिन शरीफ हिनेही प्रियामुळे तिच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2019 12:36 pm

Web Title: priya prakash varrier forcefully made the female lead in oru adaar love director makes revelations
Next Stories
1 ‘आँखे-२’मध्ये जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत?
2 खासगी आयुष्य सार्वजनिक केल्याचा नेहाला होतोय पश्चाताप
3 ‘बैजू बावरा’च्या रिमेकमध्ये शाहरुख-सलमान?
Just Now!
X