24 January 2019

News Flash

Video : ‘अखियों से गोली मारे’, प्रियाचा ‘गन शॉट’ व्हिडिओ व्हायरल

नजरेनं घायाळ करणारी प्रिया पुन्हा चर्चेत

प्रियाचा 'गन शॉट' व्हिडिओ पूर्वीच्या व्हिडिओ इतकाच व्हायरल होत आहे.

आपल्या नजरेतून छायाळ करणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर हिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘ओरू अदार लव’ चित्रपटातून प्रिया सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे पण पदार्पणाआधीच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमुळे प्रिया रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. या चित्रपटातला आणखी एक टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्यात प्रिया आणि मोहम्मद रोशन यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा खुलून आली आहे.

‘कतरिनाला इतक्या वर्षांत जमलं नाही ते प्रियाने काही मिनिटांत केलं’

वर्गात हे दृश्य चित्रित करण्यात आलं असून या दोघांची ‘स्कूलवाली लव्हस्टोरी’ काही सेकंदाच्या क्लिपमधून दाखवण्यात आली आहे. शाळेत आपल्या प्रिय व्यक्तीला चोरून पाहणं, नजरानजर होताच चेहऱ्यावर लाली येणं ही सारे क्षण प्रिया आणि मोहम्मदनं पडद्यावर खरे वाटावे इतक्या प्रभावीपणे जिवंत केले आहेत. त्यामुळे या दोघांचे व्हिडिओ पाहताना अनेकांना भूतकाळातील आपल्या शाळेचे दिवस आठवले तर नवल वाटायला नको. नजरेनं घायाळ केलेल्या प्रियानं पुन्हा एकदा या व्हिडिओमधून रिल लाईफ प्रियकर मोहम्मद रोशनच्या हृदयाचा वेध घेतला आहे. त्यामुळे प्रियाचा  ‘गन शॉट’ व्हिडिओ पूर्वीच्या व्हिडिओ इतकाच व्हायरल होत आहे.

प्रिया वरियरची या वादग्रस्त दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा

प्रिया केरळमधील त्रिशूर येथे राहते. ती वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. गाण्यासोबतच तिला नृत्याची आणि फिरण्याची आवड आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे प्रियाचं आयुष्य रातोरात पालटलं. सर्वाधिक कमी कालावधीत जास्तीत जास्त इन्स्टाग्राम फॉलोअर्स मिळवणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत ती तिसऱ्या क्रमांकावर आहे, पण गेल्या तीन चार दिवसांपासून तिला मिळत असलेल्या या प्रसिद्धीचा तिच्या कुटुंबियांना फार त्रास होत आहे त्यामुळेच या प्रसिद्धीपासून दूर ठेवण्यासाठी तिची रवानगी हॉस्टेलमध्ये करण्यात आली आहे.

First Published on February 14, 2018 10:20 am

Web Title: priya prakash varrier malayalam actress new gun shot video viral from oru adaar love