18 February 2019

News Flash

‘ती उत्फुर्त प्रतिक्रिया होती’, प्रियाच्या व्हायरल व्हिडिओमागचा किस्साही तितकाच रंजक

प्रियानं त्या दृश्याचं वर्णन केलं

प्रिया मोहिनीअट्टम शिकली आहे.

नजरेनं घायाळ करणारी प्रिया काल परवापर्यंत कोणालाच माहिती नव्हती पण आता तिचं वर्णन ‘नॅशनल क्रश’ म्हणून सगळेच जण करू लागले आहेत. ‘ओरू अदार लव’ या चित्रपटातलं ‘मणिक्या मलराया पूवी’ हे गाणं प्रदर्शित झालं पण, अनेकांना या गाण्यापेक्षा सर्वात भावली ती प्रिया आणि नजरेनं घायाळ करणारी तिची अदा. नजरेच्या एका इशारानं प्रियकरालाच काय पण देशातील लाखो तरुणांना घायाळ करणाऱ्या प्रियानं शाळेतल्या त्या गोड आठवणी अनेकांच्या मनात पुन्हा जागवल्या. म्हणून की काय अनेकांना या गाण्यातल्या इतर गोष्टीपेक्षा प्रियाचे ते नखरेच जास्त भावले.

‘कतरिनाला इतक्या वर्षांत जमलं नाही ते प्रियाने काही मिनिटांत केलं’

Video : ‘अखियों से गोली मारे’, प्रियाचा ‘गन शॉट’ व्हिडिओ व्हायरल

इंटरेनटवर सर्वात शेअर केल्या गेलेल्या त्या दृश्याबद्दल सांगताना प्रिया म्हणते की ती केवळ उत्फुर्त प्रतिक्रिया होती. हे दृश्य देशभरात वेगवेगळ्या सोशल मीडियावर इतकं व्हायरल होईल याची कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती. शाळेत दोघांमधलं प्रेम, ते नाजूक क्षण मी अभिनयातून प्रभावीपणे साकारावे अशी दिग्दर्शकांची इच्छा होती. तू भुवया उडवून काहीतरी वेगळं करता आलं तर बघ असं मला दिग्दर्शकांनी सांगितलं होतं, तेव्हा मी प्रयत्न करून पाहते इतकंच त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर प्रत्यक्ष चित्रिकरण करताना मी ते उत्फुर्तपणे करून पाहिलं हे दृश्य सगळ्यांना इतकं आवडेल याचा विचारही त्याक्षणी मला शिवला नव्हता. माझ्यासाठी ते चित्रपटातल्या इतर दृश्यासारखंच होतं अशी प्रतिक्रिया तिनं एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत दिली.

त्यामुळे कधी कधी ठरवून काही गोष्टी करण्यापेक्षा त्याक्षणी उत्फुर्तपणे निघालेल्या गोष्टी सरस ठरतात हे तिनं दाखवून दिलं. विशेष म्हणजे प्रिया मोहिनीअट्टम शिकली आहे. त्यामुळे याचा फायदाही तिला झाला. प्रिया महिला महाविद्यालयात शिकत आहे. प्रियाच्या ‘मणिक्या मलराया पूवी’ हे गाण्यानं गेल्या तीन चार दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे गाणं यूट्युबवर आतापर्यंत १ कोटी ४० लाख लोकांनी पाहिलं आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे प्रियाच्या फॉलोवर्समध्येही वाढ झाली आहे. सर्वात कमी कालावधीत इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स मिळवणारी प्रिया ही जगातील तिसरी सेलिब्रिटी ठरली आहे. प्रियाचे सध्या इन्स्टाग्रामवर ३० लाख फॉलोअर्स आहेत.

First Published on February 14, 2018 11:38 am

Web Title: priya prakash varrier malayalam actress reveals the story of her wink in manikya malaraya poovi