28 January 2021

News Flash

प्रिया वारियरचे नवे गाणे प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

फक्त आपल्या डोळ्यांच्या इशाऱ्याने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया प्रकाश वारियर आहे. प्रिया अनेक वेळा सोशल मीडियावर चर्चेत असते. ‘ओरु अदार लव्ह’मधील व्हिडीओमुळे चर्चेत आलेली प्रिया आता आणखी एका खास कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. या चर्चा तिचे नवे गाणे प्रदर्शित झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

प्रियाचा नवीन म्यूजिक व्हिडीओ आला आहे. हे एक तेलुगू गाणं असून आज मकर संक्रांतीच्या दिवशी हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याचे नाव ‘लाडी लाडी’ आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून म्युजिक व्हिडीओ प्रदर्शित होणार याची माहिती एका पोस्टद्वारे दिली होती. त्या पोस्टमध्ये या म्यूजिक व्हिडीओचे पोस्टर प्रियाने शेअर केला आहे.

Video: एकेकाळी सेटवर ‘हा’ अभिनेता करायचा सर्वात जास्त फ्लर्ट, जया प्रदा यांनी सांगितले नाव

या गाण्यात प्रिया सोबत रोहित नंदन आहे. तर हे गाणं प्रिया आणि राहूल सिपलिगंजने गायले आहे. श्री चरण पकाला यांनी या गाण्याला म्युजिक दिले आहे. लवकरच प्रिया ‘श्रीदेवी बंगला’ आणि ‘लव्ह हॅकर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 2:10 pm

Web Title: priya prakash varrier shared her musical video of ladi ladi dcp 98 avb 95
Next Stories
1 भोजपूरी सुपरस्टारची मुंबईच्या रस्त्यावर दादागिरी, व्हिडिओ व्हायरल
2 पाठिंब्यासाठी शेतकऱ्यांनी रोखलं होतं जान्हवी कपूरच्या चित्रपटाचं शूटिंग
3 इस पतंग को ढिल दे….; मकर संक्रांतीवर तयार झालेली ही गाणी तुम्ही ऐकलीत का?
Just Now!
X