20 February 2019

News Flash

प्रिया वरियरची या वादग्रस्त दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा

प्रियाला बॉलिवूड चित्रपटांचीही ऑफर

प्रिया वारियर

चेहऱ्यावरील हावभाव आणि दिलखेचक अदांनी तिने जग जिंकलं असं म्हणायला हरकत नाही. अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर अधिराज्य गाजवलेली किंबहुना अजूनही गाजवणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. आगामी ‘उरू अदार लव्ह’ या सिनेमातील ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्यामुळे तिचे नशिब रातोरात बदलले. या गाण्याची एक क्लिप तुफान व्हायरल होत असून आता प्रियाला मल्याळमसोबतच, तमिळ, तेलुगू आणि बॉलिवूडमधूनही ऑफर्स मिळत आहेत.

‘सीएनएन न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने तिला भरभरून मिळत असलेल्या प्रसिद्धीबाबत प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत राहिलेले ‘पद्मावत’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची इच्छाही तिने व्यक्त केली. ‘हे सर्व अचानक घडलं. हा माझा पहिला चित्रपट आहे. दिग्दर्शकांनी मला फक्त हावभाव करण्यास सांगितले आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. मला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल मी सर्वांचे आभार मानते. मी आणि माझे कुटुंबीय खूश आहेत, पण या प्रसिद्धीला कसं हाताळायचं हेच आम्हाला समजत नाहीये,’ असं ती म्हणाली.

PHOTO: शाहरुखने घेतली बॉलिवूडच्या ‘कोहिनूर’ची भेट

यावेळी बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करत ती पुढे म्हणाली की, ‘मल्याळम, तमिळ आणि बॉलिवूड चित्रपटांचे मला बरेच ऑफर्स मिळत आहेत. पण अद्याप मी कोणालाच होकार दिला नाही. बॉलिवूडमध्ये मी नक्कीच काम करेन. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे.’

प्रियाचा हा पहिलाच सिनेमा असून त्यात तिने एका शाळकरी मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. लवकरच या सिनेमाचा आणखी एक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on February 13, 2018 7:28 pm

Web Title: priya prakash varrier wants to work with this controversial bollywood director