28 November 2020

News Flash

प्रियांकाचे आणखी एक हॉलीवूड कौतुक!

प्रियांका चोप्राने गेल्या काही वर्षांत बॉलीवूडसह हॉलीवूड जगतातही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

प्रियांका चोप्राने गेल्या काही वर्षांत बॉलीवूडसह हॉलीवूड जगतातही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

हॉलीवूड आणि बॉलीवूड सगळीकडेच सध्या प्रियांका चोप्राचे कौतुकगान सुरू आहे. इकडे मायदेशात तिची निर्मिती असलेल्या पहिल्याच मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत म्हणून तिचे कौतुक होते आहे, तर तिकडे हॉलीवूडमध्ये ‘कान’  या प्रतिष्ठित महोत्सवानंतर आता ‘ट्रिबेका’ चित्रपट महोत्सवात ती परीक्षक म्हणून काम पाहणार आहे. शिवाय, लवकरच तिचा पहिला हॉलीवूडपट ‘बेवॉच’ही प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे सगळ्याच आघाडय़ांवर यशाची चव चाखणाऱ्या प्रियांकावर कौतुकाचा वर्षांवच होणार!

प्रियांका चोप्राने गेल्या काही वर्षांत बॉलीवूडसह हॉलीवूड जगतातही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक हिंदी चित्रपटांमधून भूमिका करीत इंग्रजी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या या अभिनेत्रीची एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

‘ट्रिबेका’ चित्रपट महोत्सवात ती परीक्षक म्हणून काम पाहणार आहे. हा चित्रपट महोत्सव १९ ते ३० एप्रिलदरम्यान होणार असून यात तिच्यासोबत हॉलीवूडच्या काही दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर हॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता डाऊने जॉन्सन याच्याबरोबरच्या ‘बेवॉच’ या चित्रपटाद्वारे हॉलीवूड पदार्पणासाठीही ती सज्ज झाली आहे. प्रियांकाने या चित्रपटात पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 2:48 am

Web Title: priyank chopra one more achievement in hollywood
Next Stories
1 एकता कपूरच्या नव्या वाहिनीवर नेताजींची कथा
2 आमिरच्या ‘वॉटर कप’चं तुफान ‘स्टार प्रवाह’वर
3 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये रविना टंडन
Just Now!
X