News Flash

मला बिकीनी घालायला आवडते- प्रियांका चोप्रा

प्रियांका ‘बेवॉच’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

प्रियांका चोप्रा

तुम्हाला प्रियांकाचा मेरी क्लेअर या मासिकासाठी बिकनीमध्ये केलेले फोटोशूट आठवते का? या बिकीनीमध्ये ती फारच मादक दिसत होती.
सध्या प्रियांका क्वांटिकोच्या दुसऱ्या सिझनच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. पण तिच्या व्यग्र कारभारातूनही तिने मेरी क्लेअर मासिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तुला बिकीनी, वन पीस यांपैकी नक्की काय घालायला आवडते?, असा प्रश्न विचारला. यावर प्रियांका म्हणाली की, ‘मला बिकीनी घालायला अधिक आवडते. बिकीनीमध्ये असताना मला अधिक मोकळे वाटते.’ तसेच तुला अभिनेत्री व्हायला आवडलं असतं की एरोनॉटिकल अभियंता? या प्रश्नावर उत्तर देताना ‘सध्या मी अभिनेत्री आहे त्यामुळे मी अभिनेत्री असेच सांगेन पण मला उडायला आवडतं,’ असे उत्तर तिने दिले होते.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हिंदी सिनेसृष्टीसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रसिद्ध झाली असून सध्या तिच्या कारकिर्दीतील एका महत्त्वाच्या वळणावर आहे. ‘क्वांटिको’ या मालिकेच्या माध्यमातून प्रियांका चोप्राने प्रेक्षकांवर एक अनोखी छाप सोडली आहे. लवकरच प्रियांका ‘बेवॉच’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. होळीच्या रंगात रंगलेला एक फोटो शेअर करत त्याला तिने ‘डू मी अ फेव्हर लेट्स प्ले होली..’ असे कॅप्शन दिले होते. यंदाही प्रियांका परदेशातच होळीचा सण साजरा केला तरीही होळीबद्दलचा तिचा उत्साह जराही कमी झालेला दिसत नव्हता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 6:25 pm

Web Title: priyanka admits i love wearing bikini i feel freer and happier
Next Stories
1 दारु पिऊन विमानात सुनील ग्रोव्हरवर ओरडला कपिल शर्मा?
2 फोटो : करिनाचा लेकासोबत हा फोटो पाहिलात का?
3 ‘फुकरे रिटर्न’चे पहिले पोस्टर प्रदर्शित
Just Now!
X