16 October 2019

News Flash

प्रियांका-निकचं असं असेल हनिमून प्लॅनिंग

सुट्टीवरुन परतल्यानंतर प्रियांका आगामी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करणार आहे.

प्रियांका चोप्रा, निक जोनास, priyanka chopra, nick jonas

जोधपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणाऱ्या निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांच्या लग्नाचं जंगी सेलिब्रेशन सध्या सुरु आहे. नुकतंच या जोडीने दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये शाही रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. त्यानंतर ते बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी मुंबईमध्ये एक रिसेप्शन पार्टी देणार आहेत. त्यानंतर ही जोडी हनिमूनला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लग्नाच्या धामधुमीतून थोडीशी उसंत घेत ही जोडी एकमेकांना वेळ देणार आहे. विशेष म्हणजे ही जोडी दोन वेळा हनिमूनला जाणार आहे. ख्रिसमसच्या सुट्टीत एकदा आणि त्यानंतर प्रियांकाच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांदा अशा दोन वेळा त्यांनी हनिमूनचा प्लॅन केला आहे.

ख्रिसमसच्या काळात प्रियांका सुट्टी घेणार असून २७ डिसेंबरला ही जोडी हनिमूनसाठी रवाना होणार आहे. त्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीमध्ये ते परत येणार असल्याचं ‘इंडिया टुडे’ने म्हटलं आहे. या लहानशा सुट्टीवरुन परत आल्यानंतर प्रियांका ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ते मोठ्या सुट्टीवर जाणार आहेत. यावेळी त्यांचा दौरा जास्त दिवसांचा असेल.

दरम्यान, प्रियंका शोनाली बोस यांच्या ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटात काम करत असून अभिनेता फरहान अख्तर तिच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

First Published on December 7, 2018 10:23 am

Web Title: priyanka and nick jonas honeymoon plan