17 July 2019

News Flash

पाणीपुरी खाणाऱ्या निक-प्रियांकाचे भन्नाट मीम्स पाहिलेत का ?

यापूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे मीम्स व्हायरल झाले होते.

प्रियांका- निक जोनास

सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे जेथे कधी एखादी गोष्ट पटकन व्हायरल होईल हे सांगता येत नाही. मग तो व्हिडिओ असो किंवा एखादा फोटो. या गोष्टी व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. यामध्ये अधिकतर बॉलिवूड सेलिब्रेटींचे मीम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात. काही दिवसापूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे मीम्स व्हायरल होत होते.त्यानंतर आता प्रियांका आणि निकचे मीम्स व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर मजेशीर मीम्स फिरु लागले. सध्या युजर्स प्रियांका-निकचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स तयाक करताना दिसत आहेत. या मीम्समध्ये पाणीपुरीपासून ते नागीन डान्स इथपर्यंत प्रत्येक गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे.
निक-प्रियांकाने ऑगस्टमध्ये साखरपुडा आणि रोका केला होता. यावेळचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. याच फोटोंचा आधार घेत नेटकऱ्यांनी त्याच्यावर मीम्स तयार केले आहेत.

या फोटोपैकी एका फोटोमध्ये निक-प्रियांकाच्या हातात एक वाटीमध्ये पाणीपुरी दाखविण्यात आली आहे. याला कॅप्शन देत ‘जे कपल्स एकत्र पाणीपुरी खातात ते आयुष्यभर एकमेकांची साथ देतात’, असं म्हटलं आहे.

इतकंच नाही तर एका फोटोमध्ये निक-प्रियांकाने हात जोडले असून ‘भारतीय मुलीशी लग्न केलं तर नागीन डान्स करणं गरजेचं आहे का ?’ असा प्रश्न निकला पडल्याचं एका युजरने दाखवलं आहे.

दरम्यान, या मीम्सप्रमाणे अन्य बरेचसे मीम्स सध्या व्हायरल होत आहेत. मात्र प्रत्येक नेटकऱ्याला निक-प्रियांकाच्या लग्नाविषयी उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे. ही जोडी जोधपूरमध्ये ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने लग्न करणार आहे.

First Published on December 1, 2018 1:41 pm

Web Title: priyanka and nick jonas marriage memes