X
X

बरेलीहून आलं निक-प्रियांकासाठी ‘हे’ खास गिफ्ट!

READ IN APP

निक-प्रियांकाने शनिवारी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं.

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी शनिवारी (१ डिसेंबर) ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. जोधपूरमधील उमेदभवन येथे या जोडीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. त्यानंतर आज ही जोडी पारंपारिक हिंदू पद्धतीने लग्न करणार आहे. त्यामुळे कालप्रमाणे आजचा दिवसही त्यांच्यासाठी खास ठरणार आहे. विशेष म्हणजे लग्नात या जोडीचं सौंदर्य खुलून दिसावं यासाठी एका चाहतीने त्यांच्यासाठी बरेलीहून खास एक भेटवस्तू पाठविली आहे.

लग्नात कोणतीही कसर राहु नये याकडे निक-प्रियांका जाणीवपूर्वक लक्ष देत आहे. या गडबडीमध्ये निक आणि प्रियांका यांचं सौदर्य खुलून दिसावं यासाठी बरेलीमध्ये राहणाऱ्या निशा मिश्रा नावाच्या एका मुलीने थेट बरेलीहून सुरमा आणि एक काजळाची डबी पाठविली आहे. प्रियांकाच्या मेकअप लिस्टमध्ये बरेलीचाच सुरमा आणि काजळ असावं अशी या चाहतीची इच्छा होती.

दरम्यान, प्रियांका-निकच्या लग्नासाठी बरेलीहून सुरमा आणि काजळ जोधपूरला पोहचलं आहे, असं बरेलीचे सुरमा व्यापारी जाहीद शमशी यांनी सांगितलं. निक-प्रियांका आज हिंदू पद्धतीने लग्न करणार आहेत. त्यामुळे हा शाही विवाहसोहळा उमेदभवनमध्ये व्हावा अशी प्रियांकाच्या आईची इच्छा होती. अखेर देसी गर्लनेही आईचं मन राखत या भवनात लग्नगाठ बांधण्याचं निश्चित केल्याचं पाहायला मिळत आहे.

21
X