16 October 2019

News Flash

Photo : अमेरिकन सून झाल्यानंतर प्रियांकाने केला नावात बदल

प्रियांका लवकरच आगामी 'द स्काई इज पिंक' चित्रपटाच्या चित्रीकरणाकडे वळणार आहे.

प्रियांका -निक

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. १ आणि २ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये लग्न केलेल्या या जोडीने नुकतंच दिल्लीमध्ये एका ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे नियांकाच्या लग्नाप्रमाणेच या पार्टीचीही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. या साऱ्या सोहळ्यानंतर प्रियांका पुन्हा एकदा सोशल मीडियाकडे वळली आहे. प्रियांका  इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली असून तिने तिच्या नावात बदल केल्याचं पाहायला मिळालं.

निक जोनासशी लग्न केल्यानंतर प्रियांका आता अधिकृतपणे अमेरिकेची सून झाली आहे. त्यामुळे आता प्रियांकाने तिच्या सासरचंही नाव तिच्यासोबत जोडलं आहे. ‘देसी गर्ल’ने इन्स्टावर तिच्या नावात बदल करत ‘प्रियांका चोप्रा-जोनास’ असं केलं आहे. विशेष म्हणजे तिने नावात केलेला हा बदल चाहत्यांना आवडत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावही होत आहे.

दरम्यान,  प्रियांका आणि निकने हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं. परिकथेला शोभेल असाच त्यांचा भव्यदिव्य सोहळा होता. त्यामुळे या लग्नातील प्रत्येक माहिती जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा होती. मात्र लग्नातील माहिती बाहेर जाऊ नये याकडे निक-प्रियांकाने विशेष लक्ष दिलं होतं. लग्न

झाल्यानंतर आता या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे थाटामाटात केलेल्या या लग्नामध्ये अनेक अडचणीही आल्याचं पाहायला मिळालं होतं.

 

 

First Published on December 7, 2018 9:38 am

Web Title: priyanka chopra adds jonas to name instagram after wedding