News Flash

सासूबाईंसाठी प्रियांका चोप्राची ‘घोडदौड’, व्हायरल झाला व्हिडीओ

सध्या त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. नुकताच प्रियांकाने तिच्या सासूबाई डेनिस मिलर जोनास यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर त्यांच्यासोबत फोटो शेअर करत ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा! मला आनंद आहे तुम्ही आज इथे आमच्यासोबत आहात आणि आपण तुमचा वाढदिवस एकत्र साजरा करत आहोत’ असे कॅप्शन शेअर केले होते. पण सध्या सोशल मीडियावर त्या दोघींचा दुसरा एक व्हिडीओ चर्चेत आहे.

या व्हिडीओमध्ये प्रियांका आणि तिच्या सासूबाई मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा घोड्यासारखी खिंकाळताना आणि धावताना दिसते आहे. तर तिच्या सासूबाई तिचा ड्रेस पडकून घोडसवारी करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियांकाचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. या चित्रपटात प्रियांकासोबत फरहान अख्तर, झायरा वसिम मुख्य भूमिकेत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 1:17 pm

Web Title: priyanka chopra and her mother in law video viral avb 95
Next Stories
1 Video : ‘असल तो सिद्दी तर आम्हीबी हाय जिद्दी’; जगजौहरचा टीझर प्रदर्शित
2 “शर्माजींना ही माहिती वाल्मिकींनी सांगितली”; नेपाळच्या पंतप्रधानांची संगीतकाराने उडवली खिल्ली
3 लॉकडाउनमध्येही हिमेशच्या कामाला लागला नाही ब्रेक; कंपोज केली ३०० गाणी
Just Now!
X