25 February 2021

News Flash

प्रियांका आणि माझ्यात शत्रुत्व नाही- दीपिका पदुकोण

आमच्यात शत्रुत्व का असावं?

प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण

विन डिझेलसोबत ‘xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटामध्ये काम करत दीपिकाने अनेकांनाच तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची भुरळ घातली होती. भारतात तिच्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरीही जागतिक स्तरावर मात्र तिच्याच चित्रपटाची चर्चा सुरु आहे. ‘xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने दीपिका आणि विन डिझेलने परदेशवारीही केली. पण, या सर्व दौऱ्याबद्दल आणि व्यग्र वेळापत्रकाबदद्ल दीपिकाने कोणतीही तक्रार केलेली नाही. याउलट चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने मिळालेल्या अनुभवामुळे खूप साऱ्या गोष्टी शिकण्याची संधी मिळाल्याचे दीपिकाने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. या खास मुलाखतीत दीपिकाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला आहे. त्यासोबतच तिने प्रियांका सोबतच्या तिच्या नात्यावरही वक्तव्य केले असून हॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच काम केल्याच्या तिच्या अनुभवाबद्दलही सांगितले आहे.

‘xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटासाठी दीपिकाची वर्णी लागल्यापासूनच प्रियांका आणि दीपिकामध्ये खटके उडाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. याचविषयी बोलताना दीपिका म्हणाली, ‘मला फार बरं वाटतंय की तुम्ही तिचा उल्लेख करताना तिला माझी मैत्रीण म्हटलं. कारण, ती माझी चांगली मैत्रीण आहे. पण, आम्हा दोघींविषयी मी जेव्हा काही वाचते त्यावेळी मात्र आमच्या मैत्रीचा उल्लेख त्यात केलेला नसतो. ज्याचे मला फारच आश्चर्य वाटते. मी नेहमीच म्हणत आलेय की, ती (प्रियांका) एक अशी व्यक्ती आहे जिला मी कित्येक वर्षांपासून ओळखते आहे. आमच्यात जेव्हा तुलना केली जाते तेव्हा मला खरंच त्याचं फार दु:ख होतं. कारण, मुळात आमच्यात कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक शत्रुत्व नाहीच आहे. आम्ही कधीही एकमेकींच्या शत्रू नव्हतो.’

प्रियांकासोबतच्या नात्याविषयी सांगताना दीपिकाने खुलेपणाने प्रियांका आणि तिच्या नात्याची मांडणी केली. ‘आमच्यात शत्रुत्व का असावं? तिच्या क्षेत्रात ती चांगलं काम करत आहे’, असे प्रियांकासोबत कोणतेही शत्रुत्व नसल्याचा स्पष्ट खुलासा दीपिकाने केला आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या कॉकटेल आणि आफ्टर पार्टीमध्ये बॉलिवूडच्या या दोन अभिनेत्रींनी त्यांच्या अदांनी अनेकांनाच घायाळ केले होते. या आफ्टर पार्टीमध्ये दीपिका आणि प्रियांका दोघींनीही काळ्या रंगाचे ड्रेस परिधान केले होते. ग्लॅमरस लूकमधील या दोन्ही अभिनेत्रींनी अनेकांचेच लक्ष वेधले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 3:37 pm

Web Title: priyanka chopra and i are not professional rivals says deepika padukone
Next Stories
1 ‘हिचकी’मधून राणी करणार पुनरागमन
2 ‘हॉलीवूडने श्रद्धांजली वाहिलेल्या ओम पुरींना बॉलीवूड विसरले’
3 कोकेन घेणाऱ्या अभिनेत्रीवर आली तोंडघशी पडण्याची वेळ; शेखर सुमनचा कंगनाला उपरोधिक टोला?
Just Now!
X