प्रियांका आणि निक हे कथित जोडपं सध्या सिंगापूरमध्ये आहेत. निक अमेरिकन सिंगर आहे त्याचे जगभरात चाहते आहेत. महिन्याभरापूर्वी म्यूझिक कॉन्सर्टमध्ये सादरीकरण केलेला नीक आता आणखी एका कॉन्सर्टसाठी सिंगापूरला पोहोचला आहे. विशेष म्हणजे निकसोबत त्याची ‘लेडी लव्ह’ प्रियांका चोप्रादेखील आहे.

प्रियांका आणि निकला सिंगापूर विमानतळावर अनेकांनी पाहिलं. विशेष म्हणजे या ग्लोबल स्टारला अनेकांनी ओळखलं. म्यूझिक कॉन्सर्ट होईपर्यंत हे जोडपं सिंगापूरमध्ये थांबणार आहे. म्युझिक कॉन्सर्टच्या आधी क्रूझवरही या दोघांनी काही खास क्षण व्यतीत केले. प्रियांका आणि निकचे सिंगापूरमधले काही फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.

गेल्या महिन्यात या दोघांनी गुपचूप साखपूडा केल्याच्या चर्चा होत्या. साखरपुड्यानंतर हे जोडपं पहिल्यांदाचं दिसलं. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या ट्विटनंतर या दोघांनी साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलं मात्र या दोघांनी साखपुड्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नाही. ऑक्टोबरमध्ये हे दोघं लग्नाही करणार आहेत असंही म्हटलं जात आहे.