News Flash

स्वप्नपूर्ती! निक-प्रियांकाच्या गृहप्रवेशाचे कधीही न पाहिलेले फोटो

तिचे हे फोटो सध्या चर्चेत आहेत.

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कायम चर्चेत असते. नुकतच प्रियांकाचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात प्रियांकाने तिचा संपूर्ण जीवनप्रवास उलघडला आहे. तिने पुस्तकात काही चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला तर काही वाईट अनुभवांचा देखील उल्लेख केला आहे. प्रियांकाने नव्या घरात गृहप्रवेश करतानाचे फोटो पुस्तकामध्ये शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

प्रियांकाने तिच्या या पुस्तकात लॉस एंजलसमधील घरात गृहप्रवेश करतानाचे फोटो शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करत तिने ‘क्वारंटाइनच्या काळात नव्या घरात शिफ्ट होणे आमच्यासाठी खूप असमान्य होते. पण आम्ही हा गृहप्रेवशाचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला’ असे कॅप्शन दिले आहे.

प्रियांकाच्या पुस्तकातील आणखी काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये तिच्या लग्नाचे काही फोटो आहेत तर काही निकसोबत वेळ घालवतानाचे फोटो आहेत. ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकामुळे प्रियांकाच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. एका मुलाखतीमध्ये प्रियांकाने, ‘मला कोणालाही उत्तर द्यावे लागेल असे मी माझ्या पुस्तकात लिहिलेले नाही. मी माझ्या जीवनातील अनेक गोष्टींचा या पुस्तकात उल्लेख केला आहे’ असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 1:42 pm

Web Title: priyanka chopra and nick jonas griha pravesh ceremony unseen photo avb 95
Next Stories
1 anniversary Special : तिच्या एका होकारामुळे महेश बाबू झाला महाराष्ट्राचा जावई!
2 काळवीट हत्या प्रकरण : ते प्रतिज्ञापत्र चुकून दिलं, सलमाननं मागितली माफी
3 Video : वैयक्तिक आयुष्याचा कामावर परिणाम होतो का? विशाखा सांगते…
Just Now!
X