सर्व चर्चांवर पूर्णविराम देत अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी साखरपुडा करत त्यांच्या नात्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलं. प्रियांकाच्या मुंबईतील घरी पार पडलेल्या या छोटेखानी सोहळ्यात त्या दोघांनीही सहजीवनाच्या प्रवासाच्या नव्या पायरीवर पाऊल ठेवलं. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

भारतीय पारंपरिक वेशभूषेतील प्रियांका- निकचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि त्याचबरोबर पाहायला मिळाले ते म्हणजे गमतीशीर मीम्स. अगदी ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातील डायलॉगपासून ते बॉलिवूडच्या गाण्यापर्यंतच्या कल्पना वापरत भन्नाट मीम्स पाहायला मिळाल्या.