07 July 2020

News Flash

थोड्याच वेळात ख्रिश्चन पद्धतीनं प्रियांका-निक अडकणार लग्नाच्या बेडीत

दीपिका रणवीरप्रमाणे दोघांनीही आपला विवाहसोहळा पूर्णपणे खासगी राहिल याची खबरदारी घेतली आहे.

प्रियांका- निक

दीपिका रणवीर नंतर आता अवघ्या थोड्याच वेळात प्रियांका – निक विवाहबंधनात अडकणार आहे. जोधपुरमधल्या आलिशान उमेद भवनमध्ये ख्रिश्चन पद्धतीनं निक आणि प्रियांकाचा विवाह होणार आहे. या दोघांच्याही लग्नाकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे पण दीपिका रणवीरप्रमाणे दोघांनीही आपला विवाहसोहळा पूर्णपणे खासगी राहिल याची खबरदारी घेतली आहे.

बॉलिवूड आणि हॉलिवूडमधली खास आणि मोजकीच मंडळी सध्या या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. कालपासूनच जोधपूरमध्ये पाहुण्यांच्या आगमनाला सुरूवात झाली आहे. मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडल्यानंतर दोघंही आज सहजीवन एकत्र व्यतीत करण्याची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी सातच्या दरम्यान या दोघांचा ख्रिश्नच पद्धतीनं विवाह पार पडणार असल्याचं समजत आहे. ख्रिश्चन पद्धतीनं विवाहसोहळा पार पडल्यानंतर पारंपरिक भारतीय पद्धतीनं ते दोघंही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

या लग्नातील कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी प्रियांका आणि निकनं विवाहस्थळी मोबाइल पूर्णपणे बॅन केले आहेत. विवाहसोहळा पार पडल्यानंतर प्रियांका निक मुंबई आणि दिल्लीत ग्रँट रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत. दरम्यान आजच्या दिवशी मुंबईत दीप-वीरचाही रिसेप्शन सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण बॉलिवूडला आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. हे रिसेप्शन देखील संध्याकाळीच सुरू होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2018 5:12 pm

Web Title: priyanka chopra and nick jonas tie the knot today in christain customs
Next Stories
1 ….तर मी ‘मणिकर्णिका’चं प्रमोशन करणारच नाही
2 ‘अकस’ पुरस्काराने होणार सामान्यांतील कर्तृत्त्वाचा गौरव
3 Video : पिंजरामधील ‘या’ गाण्याचा ‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये रिमेक
Just Now!
X