News Flash

लग्नाच्या फोटोंचे हक्क विकले, प्रियांका कमावणार कोट्यवधी

प्रियांकासोबतच मासिकालाही या करारातून प्रचंड नफा मिळणार आहे. या फोटोंच्या हक्कासाठी अनेक मासिकांनी कोट्यवधींची बोली लावली होती.

प्रियांका चोप्रा- निक जोनास

स्वत:च्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सेलिब्रिटींची जगात कमी नाही. अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीत गणले जाणारे सेलीब्रिटी आपल्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करतात. मात्र बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ याबाबत इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत चतुर निघाली. तिनं लग्न होण्यापूर्वीच लग्नातल्या फोटोंचे सारे हक्क एका आंतरराष्ट्रीय मासिकाला विकून त्यातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

प्रियांका डिसेंबर महिन्यात अमेरिकन गायक निक जोनाससोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या बहुप्रतिक्षित लग्नाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. राजस्थानमधल्या आलिशान महालात पारंपरिक भारतीय पद्धतीनं हा विवाहसोहळा होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच या लग्नाचं कुतूहल आहे. मात्र लग्नापूर्वी प्रियांकानं व्यावहारिक करार करत आपल्या लग्नाच्या फोटोंचे हक्क मासिकाला विकले आहेत. तिनं एका मासिकासोबत २.५ मिलिअन डॉलर म्हणजेच जवळपास १८ कोटी २६ लाखांचा करार केला असल्याचं समजत आहे. या करारानुसार प्रियांका-निकच्या लग्नातले खास फोटो केवळ या मासिकाकडे उपलब्ध असणार आहेत. या मासिकाकडे ते प्रसिद्ध करण्याचा हक्क असणार आहे. अर्थात प्रियांकासोबतच मासिकालाही या करारातून प्रचंड नफा मिळणार आहे. या फोटोंच्या हक्कासाठी अनेक मासिकांनी कोट्यवधींची बोली लावली होती. यापूर्वी अभिनेत्री सोनम कपूर हिनं आपल्या लग्नातील फोटोंचे हक्क ‘व्होग’ मासिकाला विकले होते.

प्रियांकाकडे अभिनयाबरोबरच व्यवहार चातुर्यही आहे. वर्षभरापूर्वी तिनं आईसोबत स्वत:ची निर्मिती कंपनी सुरू केली होती. याव्यतीरिक्त तिनं एका डेटिंग अॅपमध्येही मोठी रक्कम गुंतवली आहे. जगातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी तसेच मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीतही प्रियांकाचं नाव आहे. २ डिसेंबरला तिचा विवाहसोहळा जोधपूरमध्ये पार पडणार असल्याच्या चर्चा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 1:33 pm

Web Title: priyanka chopra and nick jonas wedding pictures sold for a whopping amount to an international magazine
Next Stories
1 ‘सुपर ३०’ची धुरा कबीर खान यांच्या खांद्यावर ?
2 Video : महिला कुस्तीपटूकडून राखी सावंतला धोबीपछाड
3 अखेर वरुणनं दिली नताशासोबतच्या नात्याची कबुली
Just Now!
X