News Flash

नियतीने आम्हाला एकत्र आणलं – निक जोनास

प्रियांका लवकरच विदेशी सूनबाई होणार आहे.

निक -प्रियांका

क्वांटिको मालिकेद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोपडा आता हॉलिवूडमध्येच रंगली आहे. विशेष म्हणजे या हॉलिवूडच्या वाटेवरच तिला तिचा जीवनसाथी निक जोनास भेटला.त्यामुळे आता प्रियांका लवकरच विदेशी सूनबाई होणार आहे. काही दिवसापूर्वीच निक-प्रियांकाचा मुंबईमध्ये साखपुडा पार पडला. आता हे दोघं लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र निक आणि प्रियाकाचं सूत जुळलं तरी कसं हे जाणून घेण्याची उत्सुकता या सेलिब्रेटींच्या चाहत्यांमध्ये असल्याचं पाहायला मिळालं.

निक आणि प्रियांका यांनी लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतल्यामुळे या दोघांच्या मित्रपरिवाराबरोबरच त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे या जोडीची लव्हस्टोरी जाणून घेण्याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. मात्र या दोघांनीही कधीही त्यांची लव्हस्टोरी जगजाहीर केली नव्हती. परंतु एका कार्यक्रमामध्ये खुद्द निकनेच या साऱ्यावरचा पडदा दूर सारुन आपली प्रेमकथा सांगितल्याचं पाहायला मिळालं आहे.

काही दिवसापूर्वी निक आणि प्रियांकाने द टुनाइट शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक जिमी फॉलन याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत निकने त्याची लव्हस्टोरी सांगितली. ‘एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून माझी आणि प्रियांकाची पहिली भेट झाली. या भेटीनंतर आम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र होतो. मेसेजच्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी बोलायचो. त्यावेळी आमच्या मनातही लग्नाविषयी किंवा प्रेमाविषयी कोणतीही भावना नव्हती. पण जसजशी ओळख वाढू लागली आम्ही एकमेकांमध्ये गुंतत गेलो. पहिल्या भेटीनंतर ६ महिने उलटल्यावर आम्ही भेटण्याचा निर्णय घेतला. या भेटीत आमची साधी चर्चा झाली. त्यानंतर मे २०१७मध्ये आम्ही मेट गालाच्या रेड कार्पेटवर एकत्र दिसून आलो. मात्र यावेळी देखील आमच्यात केवळ निखळ मैत्रीच होती’, असं निक म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘मेट गालानंतर असे अनेक किस्से झाले की ज्यामुळे आम्ही सतत एकमेकांना भेट राहिलो. थोडक्यात आम्ही एकमेकांपासून दूर गेलो तरी आमचं नशीब आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होतं आणि पुढे तसंच झालं आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं आम्हाला जाणवं. त्यामुळेच आम्ही साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. आमच्या नियतीनेच आम्हाला एकत्र आणलं आहे’.

दरम्यान, पहिल्यांदाच निकने त्याच्या आणि प्रियांकाच्या नात्याविषयी एवढं स्पष्टपणे वक्तव्य केलं आहे. मात्र त्याच्या या उत्तरामुळे निक-प्रियांकाच्या चाहत्यांना असलेली उत्सुकता नक्कीच कमी झाली असेल हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 2:32 pm

Web Title: priyanka chopra and nick love affair
Next Stories
1 ‘ती गोष्ट माझ्या तोंडावर बोलण्याची हिंमत फक्त रणबीरमध्येच’
2 The Nun box office collection Day 3: ‘स्त्री’ला टक्कर देतेय हॉलिवूडची ‘द नन’
3 अंशुला म्हणते, ही आहे बोनी कपूरची लाडकी लेक
Just Now!
X