News Flash

निक-प्रियांका डिझायनर मनीष मल्होत्राला पसंती देणार?

प्रियांका लग्नातील प्रत्येक गोष्टींची जाणीवपूर्वक निवड करताना दिसत आहे.

निक जोनास, प्रियांका चोप्रा

‘क्वांटिको गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ऑगस्ट महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर १४-१५ जानेवारी रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे निक आणि प्रियांकाने लग्नाच्या खरेदीला सुरुवात केली असून प्रियांका लग्नात बॉलिवूडमधील एका नावाजलेल्या डिझायनरने डिझाइन केलेला लेहंगा परिधान करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण असतो. त्यामुळे प्रियांकादेखील तिच्या लग्नासाठी उत्सुक आहे. प्रियांका लग्नातील प्रत्येक गोष्टींची जाणीवपूर्वक निवड करताना दिसत आहे. यामध्येच लग्नात परिधान करण्यात येणाऱ्या लेहंग्यासाठी तिने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राची निवड केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रियांका लग्नात मनीषने डिझाइन केलेला लेहंगा परिधान करु शकते.

अनेक वेळा प्रियांका मनीषने डिझाइन केलेल्या कपड्यांना पसंती देत असते. काही दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये देखील प्रियांकाने मनीषने डिझाइन केलेले कपडे घातले होते. यावेळी मनीषने प्रियांकाचा एक फोटोदेखील शेअर केला होता. त्यामुळे लग्नातदेखील प्रियांकाची पहिली पसंती मनीषच्या डिझाइनला असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वी प्रियांकाने डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता या तिन्ही डिझायनरपैकी प्रियांका कोणाची निवड करणार याकडे हे पाहणं महत्वाचं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 11:35 am

Web Title: priyanka chopra and nick wedding outfits and dress fashion designer manish malhotra
Next Stories
1 अभिनेता एजाज खानला अटक, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
2 ‘#MeToo मोहिमेने पितृसत्ता संस्कृतीला धक्का दिला, पुढील लढाई आणखी कठीण’
3 दीप-वीरच्या लग्नात ‘या’ कलाकारांची खास उपस्थिती
Just Now!
X