News Flash

ब्रिटनच्या शाही विवाहसोहळ्याला बॉलिवूडच्या ‘देसी गर्ल’ची उपस्थिती

विवाहसोहळ्यात प्रियांका चोप्राचा खास अंदाज..

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात प्रियांका चोप्राने ब्रिटनचा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही विवाहसोहळ्याला हजेरी लावली. या लग्नाला प्रियांका हजर राहणार की नाही याविषयीच्या बऱ्याच चर्चांना कलाविश्वात उधाण आलं होतं. युकेमध्ये पोहोचल्यानंतर सोशल मीडियावरून प्रियांका चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असल्याचं पाहायला मिळालं.

ज्यावेळी प्रिन्स हॅरी आणि मेगनच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा करण्यात आली तेव्हाही प्रियांकाने या दोघांना नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आता या विवाहसोहळ्यात प्रियांकाचा शाही अंदाज पाहायला मिळाला. फिकट जांभळ्या रंगाचा ड्रेस आणि हॅट अशा पोशाखात ‘देसी गर्ल’ या शाही विवाहसोहळ्यात अवतरली.

जाणून घ्या, ब्रिटीश राजघराण्याच्या होणाऱ्या सूनेबद्दल

प्रियांका आणि मेगन या खूप चांगल्या मैत्रिणी असून, त्यांच्या मैत्रीचे किस्से सोशल मीडियावरही पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आपल्या मैत्रिणीच्या आयुष्यातील खास दिवशी ‘देसी गर्ल’ने हक्काने हजेरी लावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2018 4:20 pm

Web Title: priyanka chopra attends prince harry meghan markle royal wedding
Next Stories
1 karnataka Election: बहुमत चाचणीपूर्वी येडियुरप्पांचा राजीनामा
2 प्रताप गौडा पाटील आम्हाला दगा देणार नाही – काँग्रेस
3 ऑपरेशन लोटस फेल, कर्नाटकात येडियुरप्पा सरकार कोसळलं
Just Now!
X