News Flash

Video : मादाम तुसाँच्या परदेशी संग्रहालयामध्ये ‘देसीगर्ल’चा जलवा

मादाम तुसाँच्या ऑफिशियल पेजवरही प्रियांकाच्या स्टॅचू मेकिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे.

प्रियांका चोप्रा

अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा केवळ देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे जगभरातल्या चाहत्यांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये तिच्या चर्चा रंगत असतात. तिच्या याच लोकप्रियतेमुळे एक नवा विक्रम तिच्या नावे केला आहे. प्रसिद्ध अशा मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये प्रियांकाच मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जगभरातील चार मादाम तुसाँ संग्रहालयात प्रियांकाच्या पुतळ्यांना स्थान मिळालं आहे.

न्युयॉर्कमध्ये असलेल्या मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये नुकतंच प्रियांकाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळचे काही फोटोही प्रियांकाने सोशळ मीडियावर शेअर केले होते. त्यासोबतच मादाम तुसाँच्या ऑफिशियल पेजवरही प्रियांकाच्या स्टॅचू मेकिंगचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या संग्रहालयाव्यतिरिक्त अन्य तीन संग्रहालयातही प्रियांकाला स्थान मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

न्युयॉर्क, लंडन, सिडनी आणि आशियातील मादाम तुसाँ म्युझियममध्ये प्रियांकाचे मेणाचे पुतळे उभे राहणार आहेत. त्यामुळे प्रियांकासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका लवकरच ‘इजंट इट रोमँटिक’ आणि ‘अ किड लाइक जॅक’ या दोन हॉलिवूड चित्रपटांत दिसणार आहे. याशिवाय ‘द स्काय इज पिंक’ या हिंदी चित्रपटाचंही शूटिंग सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2019 3:58 pm

Web Title: priyanka chopra becomes first to have 4 madame tussauds wax figures
Next Stories
1 कंगनाच खरी रॉकस्टार – अनुपम खेर
2 हॅण्डसम टायगरला हिरोइन मिळेना
3 Video : ‘लकी गर्ल’ची धमाकेदार एण्ट्री, मिळालं ‘हिरोइन- इंट्रोडक्शन’ साँग
Just Now!
X