22 October 2020

News Flash

..म्हणूनच न्युयॉर्कच्या रस्त्यावर थिरकली प्रियांकाची पावले

प्रियांकाने गुलाबी रंगाचा थाई स्लिट कट ड्रेस घातला असून यात ती ग्लॅमरस अंदाजात दिसून येत आहे.

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी क्वांटिको गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी भारत चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भारतात परत आले. यावेळी तिच्याबरोबर कथित प्रियकर निक जोनासदेखील आल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा थांबल्या असून सध्या प्रियांकाविषयीच्या नव्या चर्चांनी उधाण घेतलं आहे

कायम चर्चेत राहणारी ग्लोबल गर्ल प्रियांकाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ती चक्क न्युयॉर्कच्या रस्त्यावर थिरकताना दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून सहाजिकच तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला असून नुकतंच या प्रश्नांचं उत्तर समोर आलं आहे. हॉलिवूडमधील ‘इजन्ट इज रोमांटिक’ या चित्रपटातील एका गाण्यासाठी हे चित्रीकरण सुरु असून त्यासाठीच प्रियांका रस्त्यावर थिरकताना दिसून येत आहे.

प्रियांकाच्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये प्रियांकाने गुलाबी रंगाचा थाई स्लिट कट ड्रेस घातला असून यात ती ग्लॅमरस अंदाजात दिसून येत आहे.


या गाण्यामध्ये प्रियांकाबरोबर तिचा सहकलाकार रेबल विल्सन, अॅडम डेविन आणि लियाम हेम्सवर्थ हेदेखील थिरकत आहेत. प्रियांकाचा हा आगामी हॉलिवूडपट पुढील वर्षी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी टॉड स्ट्रॉस -स्कल्सन यांनी स्वीकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 2:12 pm

Web Title: priyanka chopra dancing with liam hemsworth on newyork street
Next Stories
1 श्रीदेवी नव्हे, तर या अभिनेत्रीची फॅन आहे जान्हवी
2 लंडनच्या ट्रेनमधील विरुष्काचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल
3 Sacred games: आक्षेपार्ह संवादासाठी अभिनेता जबाबदार नाही: हायकोर्ट
Just Now!
X