07 March 2021

News Flash

VIDEO: ऑस्करच्या मंचामागे प्रियांकाने मारले टकिला शॉट्स

'बेवॉच' गर्लचा ग्लॅमरस लूक पाहावयास मिळाला.

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने काल झालेल्या ८९व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने काल झालेल्या ८९व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. ऑस्करच्या रेड कार्पेटवर झळकण्याचे प्रियांकाचे हे यंदाचे दुसरे वर्ष होते. या पुरस्कार सोहळ्याला प्रियांका उपस्थित राहणार हे कळल्यानंतर प्रियांकाच्या लूकबद्दल चांगलीच चर्चा रंगली होती. गेल्या वर्षीप्रमाणेच प्रियांकाने यावेळीही कार्यक्रमात पांढऱ्या रंगाच्या स्ट्रीपलेस गाउनमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. यावेळी तिने सिल्वर राल्फ आणि रुसो यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. प्रियांकाने तिच्या संपूर्ण पेहरावाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली.

ऑस्करच्या रेड कार्पेटवर आपल्या अदांनी घायाळ करणा-या प्रियांकाने या पुरस्कार सोहळ्याच्या मंचामागेही बरीच मजामस्ती केली. तिने मंचामागे टकिला शॉट्सही लावले. एका परदेशी वृत्तवाहिनीने प्रियांका टकिला शॉट्स मारत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. केवळ प्रियांकाच नाही तर हॉलीवूडमधील सर्व मोठे कलाकार या व्हिडिओत टकिला शॉट्स मारताना दिसतात. जस्टीन टिम्बरलेक, डकोटा जॉन्सन, ताराजी पी. हेन्सन, जेनेल मॉन, विओला डेव्हिस, जॅमी डोर्नन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मंचामागे मजामस्ती केल्याचे या व्हिडिओत दिसते.

केवळ ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नाही तर यानंतरच्या पार्टीतही या ‘बेवॉच’ गर्लचा ग्लॅमरस लूक पाहावयास मिळाला. प्रियांकाने पार्टीत काळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. यामध्ये ती अधिक मादक दिसत होती. पार्टीतील काही फोटो प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. इतकेच नव्हे तर फिटनेस आणि कमनीय बांध्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने चक्क बर्गरही खाल्ला. बर्गर हा प्रियांकाचा आवडता पदार्थ आहे. याचा व्हिडिओ आणि फोटो तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 12:11 pm

Web Title: priyanka chopra downs tequila shots at oscar 2017
Next Stories
1 Oscars 2017: देव पटेलची ‘मेरे पास माँ है’ मोमेंट
2 महेर्शाला अलीच्या ऑस्कर विजयाने पाकिस्तानमध्ये वाद
3 आलियाच्या तालावर नाचणाऱ्या या अवलियाला ओळखलंत का?
Just Now!
X