News Flash

विमानात प्रियांका चोप्राची कॉकटेल पार्टी, दारुच्या नशेत अखेर ती…

या प्रसंगामुळे प्रियांका चर्चेत

देसी गर्ल प्रियांका चोप्राने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आता जगभरात प्रियांकाचे प्रचंड चाहते असून तिच्या चर्चा सर्वदूर पसरलेल्या आहेत. प्रियांका सध्या यशाच्या अशा शिखरावर आहे. जिथे तिची प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय ठरतेय.

प्रियांका चोप्रा पती निक जोनससोबत नुकतीच 74 व्या बाफ्टा अवॉर्ड सोहळ्यात सामील झाली होती. यावेळी बिना बटनाच्या गुलाबी जॅकेटमुळे प्रियांका चांगलीच चर्चेत आली होती. यासोबतच सध्या प्रियांका एका जुन्या प्रसंगामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दारूच्या नशेत प्रियांकाने विमानात केलेललं एक कृत्य सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

नशेमध्ये अशी झाली प्रियांकाची स्थिती
हा प्रसंग काही वर्षांपूर्वीचा असून त्यावेळी प्रियांका ‘क्वान्टिको’ या हॉलिवूड वेब सीरिजमुळे प्रकाश झोतात आली होती. पिंकविलाच्या वृत्तानुसार एका फ्लाईट अटेंडेन्टने हा प्रसंग शेअर केला आहे. या फ्लाईट अटेंडेन्टने या मजेदार अनुभवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र काही वेळाने तो तिने डिलीट करून टाकला. या अटेंडेन्टच्याने सांगितलं की प्रियांकाने विमानात तिच्या एका फेव्हरेट कॉकटेलची मागणी केली होती. त्यानंतर तिने हॉट सॉसेजची मागणी केली. प्रियांकाने या कॉकटेलचे 3 ड्रिंक संपवले. त्यानंतर मात्र ती नशेत धुंद झाली. काहीवेळ तिने स्वत:ला सावरलं . नंतर मात्र ती चुपचाप झोपून गेली. फ्लाईट अटेंडेन्ट तिने शेअर केलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ डिलीट केल्याने तो इंटरनेटवर सध्या मात्र उपलब्ध नाही.

प्रिय़ांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये देखील चांगलच नाव कमावतेय. 74 व्या बाफ्टा अवॉर्डसोहळ्यात तिने पती निकक जोसनसोबत सहभाग घेतला होता. यावेळी तिच्या बोल्ड लूकने तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 8:43 am

Web Title: priyanka chopra drunk cocktail in flight and funny incident share flight attendant kpw 89
Next Stories
1 नियमांचे पालन करून चित्रीकरणासाठी वाहिन्या आग्रही
2 राधिका आपटेची कम्माल….स्कर्टलाच बनवलं लुंगी!
3 ‘या’ सत्य घटनेवर आधारित आहे अजय देवगणचा ‘मेडे’ सिनेमा; बिग बी करणार धमाका
Just Now!
X