28 February 2021

News Flash

प्रियांका चोप्राचा नोबेल विजेत्या मलालासोबत ‘फॅन मुमेन्ट’

या भेटीचा आनंद मलाला आणि प्रियांकाच्याही चेहऱ्यावर झळकत असल्याचं दिसतं

प्रियांका चोप्रा आणि मलाला युसुफजई

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानं नुकतीच नोबेल पुरस्कारविजेत्या मलाला युसुफझाईची भेट घेतली. या भेटीचा फोटो प्रियांकानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या भेटीचा आनंद मलाला आणि प्रियांकाच्याही चेहऱ्यावर झळकत असल्याचं दिसतं. मलालानं प्रियांकासोबतचा एक फोटो ट्विट केला. प्रियांकाची भेट झाली यावर माझा विश्वासच बसत नाही, असं तिनं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मलालानं केलेलं ट्विट प्रियांकानं रिट्विट केलं. ओहss मलाला, माझ्याकडे तर शब्दच नाहीत. मी तुझी भेट घेतलीय यावर माझाही विश्वास बसत नाही. तुझं मन खूप मोठं आहे. तुझ्या कर्तुत्त्वानं तू जे काही मिळवलं आहेस, त्याचा मला अभिमान आहे, असं तिनं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. प्रियांकानं महिला सशक्तीकरणावरही आपलं मत व्यक्त केलंय. प्रत्येक मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे आणि त्यांना भविष्यात प्रगती करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे ती म्हणाली.

प्रियांका युनिसेफची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. युनिसेफच्या निमित्तानं प्रियांका नेहमीच गरीब आणि कुपोषित मुलांना भेटत असते आणि त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मलाला आणि प्रियांकाच्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी दोघींनाही भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 2:02 pm

Web Title: priyanka chopra experiences a fan moment as she meets malala yousafzai
Next Stories
1 मनोज वाजपेयीच्या ‘रुख’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
2 Khatron Ke Khiladi 8: ‘खतरो के खिलाडी ८’ या तीन सेलिब्रिटींमध्ये होणार अंतिम टक्कर
3 रागीट ऋषींनी ट्विटरवर महिलेसाठी वापरले अपशब्द
Just Now!
X