News Flash

प्रियांकाच्या घरातल्यांना निक नाही तर ‘महादेव’ मालिकेतील या अभिनेत्याला बनवायचे होते जावई

स्वत: प्रियांकाने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियांका ही तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. प्रियांकाने हॉलिवूडमधील लोकप्रिय गायक निक जोनास याच्याशी लग्न केले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का प्रियांकाच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी एक मुलगा पाहिला होता.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांकाने हा खुलासा केला आहे. प्रियांका म्हणाली, “माझ्या मावशीची इच्छा होती की मी अभिनेता मोहित रैनाशी लग्न करावे. कारण त्यावेळी तो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवों के देव महादेव’ या मालिकेत शंकर देवाची भूमिका साकारत होता. तो जशी भूमिका साकारत आहे तसाच खऱ्या आयुष्यातही असेल असे तिला सारखे वाटायचे. मोहित खूप शांत, प्रामाणिक असेल असे तिला वाटायचे. त्यामुळे तो माझ्यासाठी योग्य आहे असं ती म्हणायची.”

Video: नेहा कक्कर आणि रोहनमध्ये झाले भांडण? व्हिडीओ व्हायरल

पुढे प्रियांकाने सांगितले की, “ही गोष्ट नंतर मोहितला माहिती पडली. त्याला मस्करीमध्ये याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने ‘आता काय करु शकतो आपण?’ असे म्हटले होते.”

२०१७ पासून निक आणि प्रियांका एकमेकांना डेट करत आहेत. त्यानंतर त्यांनी साखरपूडा केला. २०१८मध्ये प्रियाकांने निक जोनासशी लग्न केले. त्यांचा लग्नसोहळा राजस्थान येथील जोधपुरमधल्या उमेद भवन राजवाड्यामध्ये पार पडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 5:17 pm

Web Title: priyanka chopra family member wanted her to marry mahadev serial mohit raina avb 95
Next Stories
1 अनुराग कश्यपच्या मुलीने बॉयफ्रेण्ड सोबत शेअर केला फोटो, नेटकऱ्यांनी केली थट्टा
2 अनूप जलोटांनी जसलीनसाठी गायलं रोमॅण्टिक गाणं ; व्हिडीओ व्हायरल
3 मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मराठी अभिनेत्याला लुटलं; लंपास केले ५० हजार
Just Now!
X