News Flash

फ्रेडा पिंटो बनली ‘गर्ल राइजिंग’ अनुबोधपटाचा हिस्सा

'गर्ल राइजिंग' या अनुबोधपटातील कथांपैकी एका कथेला आपला आवाज देणारी अभिनेत्री फ्रिडा पिंटो म्हणाली, करिअरमध्ये मिळालेल्या प्रोत्साहनाने तिला या उपक्रमाचा हिस्सा बनण्यासाठी प्रेरित केले.

| June 19, 2013 07:11 am

‘गर्ल राइजिंग’ या अनुबोधपटातील कथांपैकी एका कथेला आपला आवाज देणारी अभिनेत्री फ्रिडा पिंटो म्हणाली, करिअरमध्ये मिळालेल्या प्रोत्साहनाने तिला या उपक्रमाचा हिस्सा बनण्यासाठी प्रेरित केले. जगातील विविध भागातील नऊ मुलींची कथा सांगणा-या या अनुबोधपटाचे दिग्दर्शन ऍकॅडमी पुरस्कारासाठी नामांकन झालेले दिग्दर्शक रिचर्ड ई रॉबिन्स करत आहेत. यात घरातल्या लोकांच्या मर्जीविरूद्ध झालेला विवाह, लहान मुलीची कथा आणि यौन पिडासारख्या समस्यांचा सामना करणा-या मुलींच्या कथांचा समावेश करण्यात आला आहे. या मुलींनी सर्व अडचणींवर मात करत शिक्षण घेऊन त्यांच्या जीवनात बदलाव आणला आहे. फ्रीडा पिंटो व्यतिरिक्त हॉलिवूडमधील मेरिल स्ट्रीप, एनी हॅथवे, लियाम नीसन, केट ब्लैंचेट, सेलेना गोमेज आणि बॉलिवूडमधील प्रियांका चोप्राने या चित्रपटात आपला आवाज दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 7:11 am

Web Title: priyanka chopra freida pinto bring girl rising to india
Next Stories
1 ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटास पाकिस्तानमध्ये बंदी
2 स्त्रीला कमी लेखल्यास गुन्हा दाखल व्हावा – अतुल कुलकर्णी
3 सलमानचा ‘ मेंटल’ चित्रपट होणार २४ जानेवारीला प्रदर्शित
Just Now!
X