News Flash

पुरस्कार सोहळ्यातील प्रत्येक मिनिटासाठी प्रियांका चोप्रा घेते एवढे मानधन?

२०१६ मध्ये 'गिल्ड' पुरस्कारांमध्ये शेवटचे परफॉर्म केले होते

प्रियांका चोप्रा

देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमधील तिच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. तिचे भारतात येणेही फार झाले आहे. त्यामुळेच ती भारतात आल्यावर तिला कार्यक्रमांत बोलावण्यासाठी सारेच धडपडत असतात. ती आता अमेरिकेत जरी असली तरी या महिन्याअखेरीस भारतात परतणार आहे. ‘मिड डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एका चित्रपट पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी प्रियांका मोठी रक्कम वसूल करणार असल्याचे म्हटले जात आहे. पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी प्रियांकाला चार ते पाच कोटी रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुरस्कार सोहळ्यात ती फक्त ५ मिनिटं परफॉर्म करणार आहे. याचा अर्थ तिला प्रत्येक मिनिटाला सुमारे १ कोटी रुपये मिळणार आहेत. सध्या प्रियांकाच्या नावाची फार चलती असल्यामुळे ती सांगेल ती किंमत द्यायला निर्माते तयारही होतात.

सुमारे दोन वर्षांनंतर ती भारतात परफॉर्म करणार असल्यामुळे पुरस्कारांचे संयोजक प्रियांकाच्या परफॉर्मन्सलाच महत्त्व देण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१६ मध्ये ‘गिल्ड’ पुरस्कारांमध्ये शेवटचे परफॉर्म केले होते. त्यामुळे आगामी पुरस्कार सोहळ्याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे, यात काही नवल नाही. तिच्या सुपरहिट गाण्यांवर ती थिरकणार आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यातही प्रियांका परफॉर्म करणार असे म्हटले जात होते. मात्र, प्रियांकाच्या मानधनाचा आकडा ऐकून आयफाने तिला वगळणेच योग्य समजले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 6:37 pm

Web Title: priyanka chopra get 1 crore per minute to perform at zee cine awards
Next Stories
1 काही पत्रकार फुकटची दारु प्यायला येतात; ऋषी कपूर यांचे वादग्रस्त विधान
2 शहिद सैनिकाच्या मुलीचे अनुभव ऐकून शाहरूखचे डोळे पाणावले
3 अनुष्का शर्माच्या भावाला लग्नाचे आमंत्रणच नव्हते!
Just Now!
X