News Flash

‘हे असे कपडे घालतात का?’ ड्रेसवरुन प्रियांका ट्रोल

प्रियांकाच्या त्या ड्रेसवर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रियांका चोप्रा ओळखली जाते. प्रियांकाचा चाहता वर्ग ही बराच मोठा आहे. प्रियांकासोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. तर आता प्रियांकाने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे. त्यातील एका नेटकऱ्याला तर प्रियांकाने गमतीशीर उत्तर दिले आहे.

प्रियांकाने हिरव्यारंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसचा आकार बलूनसारखा आहे. त्यावर अनेकांनी तिला ट्रोल केले होते. यावरचे अनेक मीम्सतर प्रियांकाने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देखील शेअर केले होते. प्रियांका कधीच कोणत्या ट्रोलरला उत्तर देत नाही. मात्र एका ट्विटने तिचे लक्ष वेधले आहे.

एक नेटकरी प्रियांकाला म्हणाला,” ‘हे असे कपडे घालतात का’?, मग चांगल्या फिगरचा काय उपयोग?” त्याला उत्तर देत प्रियांका म्हणाली, “खरं म्हणजे फिगर हा मुद्दाच महत्त्वाचा नसतो.” प्रियांकाच्या या उत्तराने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या प्रियांका तिच्या ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकामुळे चर्चेत आहे. ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक ९ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालं. या पुस्तकात प्रियांकाने तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या पुस्तकातील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. प्रियांकाचे हे पुस्तक बेस्ट सेलर बूक ठरलेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 2:22 pm

Web Title: priyanka chopra got trolled for wearing a dress like a balloon dcp 98
Next Stories
1 ‘बिग बॉस’फेम निक्की तांबोळी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?
2 बॉलिवूडवरील ‘त्या’ धक्कादायक वक्तव्यामुळे इमरान हाश्मी चर्चेत
3 साउथ सिनेमा ‘पोगारु’ वादाच्या भोवऱ्यात; 14 सीनला लावली कात्री
Just Now!
X