‘क्वाटिंको’ या मालिकेमधून यशाच्या शिखरावर पोहचलेली बॉलीवूडच्या देसी गर्ल प्रियांका चोप्राने आता ‘क्वाटिंको’च्या दुस-या सिझनच्या चित्रिकरणासाठी सुरूवात केलीय. ‘क्वाटिंको’ या मालिकेमुळे अमेरिकेतल्या प्रत्येक घराघरात प्रियांका चोप्रा पोहचली. ‘क्वाटिंको’मुळे प्रियांकाला मोठं यश मिळालं. तिनं साकारलेल्या अलेक्सच्या भूमिकेचं विषेश कौतुक करण्यात आलं. या मालिकेचा पहिला सिझन संपला असून नुकतच दुस-या सिझनच्या चित्रिकरणासाठीदेखील सुरूवात झालीय. प्रियांकानं चित्रकरणाच्या वेळचा एक फोटो देखील इन्स्ताग्रामवर शेअर केलाय. पहिला सिझन तर हिट झालाय दुसरा सिझन सप्टेंबरपासून टीव्हीवर येणार आहे, त्यामुळे प्रियांकाच्या तमाम फॅन्सना दुस-या सिझनची उत्सुकता लागलीय. मालिकेच्या निर्मात्यांच्या मते येणा-या काही सिझनमध्ये प्रियांका साकारत असलेलं अलेक्स हे पात्र कथानकाच्या मध्यभागी असणार आहे.