News Flash

‘बेवॉच’ची पोश्टर गर्ल प्रियांका चोप्रा

आधीच्या पोस्टरवर प्रियांका वगळता चित्रपटातील सर्व कलाकार झळकले होते.

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा बेवॉच या चित्रपटाने हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. त्या पोस्टरवर प्रियांका वगळता चित्रपटातील सर्व कलाकार झळकले होते. अखेर आता प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरवर बॉलीवूडची दीवा प्रियांका चोप्रा हिचाही समावेश करण्यात आला आहे.
बेवॉचच्या या पोस्टरमध्ये प्रियांका वगळता सर्व कलाकारांनी लाल रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत. चित्रपटात वेरोनिका ही खलनायिकेची भूमिका साकारणा-या प्रियांकाचा हॉट अंदाज पोस्टरवर दिसतो. तर अलेक्झांड्रा दद्दारिओ, इलफेनेश हॅडेरा आणि केली या अभिनेत्री पोस्टरवर बिकनीमध्ये झळकल्या आहेत. याव्यतिरीक्त ड्वेन जॉन्सन (रॉक), झॅक एफरॉन, जॉन बॅस हे कलाकार पोस्टरवर आहेत.


नव्वदीच्या दशकात टेलिव्हिजनवर आलेली ‘बेवॉच’ ही मालिका अमेरिकेसह जगभरात चांगलीच गाजली होती. दिग्दर्शक सेठ गॉर्डन यांनी आता या मालिकेवर चित्रपट तयार केला आहे.

We are officially wrapped on baywatch… Can’t believe it but we will be in theaters one year from today. #BayDay !!!

A photo posted by alexandra daddario (@alexannadaddario) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2016 11:54 am

Web Title: priyanka chopra is finally in baywatchs poster and she is smoking hot
Next Stories
1 VIDEO: सलमान आणि छोट्या अहिलची ‘सुलतान’गिरी
2 ‘रुस्तमच्या’ रेडिओ ट्रेलरने गाठला थेट १९५९ चा काळ
3 झाले-गेले विसरत कपिलच्या मोहल्ल्यात ‘सुलतानची’ हजेरी
Just Now!
X