News Flash

हॉलिवूडच्या ‘रॉयल्टी लिस्ट’मध्ये प्रियांकाच्या नावाचा समावेश

'क्वांटिको' मालिका करायला मिळाली ही प्रियांकाच्या करिअरसाठी महत्त्वाची गोष्ट होती

सध्या प्रियांका चोप्रा जे करते त्यात यशस्वी होते असेच म्हणावे लागेल. बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री झाल्यावर तिने आपला मोर्चा हॉलिवूडकडे वळवला. तिथेही तिला यशच मिळाले. सतत नवनव्या गोष्टींमुळे ती चर्चेत असते. या चर्चा तिच्या यशाची गाथाच सांगणाऱ्या असतात हे विशेष. टाइम मासिकाच्या कव्हरपेजवर ती दिमाखात झळकली आहे. एवढेच नाही तर ‘द न्यू रॉयल रिस्ट’मध्ये तिचे नावाचाही समावेश करण्यात आला आहे. मासिकाने हे स्पष्ट केले आहे की, हॉलिवूडची ही रॉयल्टी यादी वंशानुसार न निवडता चांगल्या कामगिरीवर या यादीतील नावे निवडण्यात आली आहेत. प्रियंका बरोबर या यादीत आंतरराष्ट्रीय कलाकार सिंडी क्रॉफोर्ड, क्रिस एनवास, केन वेस्ट, हाल बेर, किट हैरिंगटन, रमी मलिक, सोफिया कोपोला आणि जोडी फोस्टर यांचाही समावेश आहे.
‘क्वांटिको’ मालिका करायला मिळाली हा प्रियांकाच्या करिअरसाठी महत्त्वाची गोष्ट होती. यामुळे ती भारतामध्येच नाही तर परदेशातही नावारुपास आली. प्रियांकाने तिच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात ती म्हणाली की, ‘रॉयल्टी कोणालाही मिळू शकते. पण त्यासाठी तुम्हाला इथपर्यंत पोहचले पाहिजे.’
ती पुढे म्हणाली की, तिला खंबीर आणि हट्टी महिला जास्त आवडतात. अशा स्त्रिया ज्या आपल्या अटींवर स्वतःचं आयुष्य जगतात. ‘जेनिफर लॉरेंससारखी स्त्री मी तिचे कौतूक करते. शिवाय रिहाना, तिला कोणत्याच गोष्टीचा काही फरक पडत नाही. मला ती फार आवडते मला तिचा हा गुण फार आवडतो.’
तिने ट्विट करत लिहिले की, ‘मला हे कव्हर आवडले. धन्यवाद डब्ल्यू मॅगझिन. प्रतिभाशाली कलाकारांमध्ये माझ्या नावाचा सहभाग झाला ही माझ्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे.’ इन्स्ट्राग्रामवर तिने जो व्हिडिओ शेअर केला त्यात ती तिला मिस इंडिया किताब मिळाल्यापासून ते अन्य गोष्टींवर ती मनमोकळेपणाने बोलली आहे.

Next Stories
1 सलमान खानची प्रेयसी लुलियाने शेअर केला तिच्या मुलीचा फोटो
2 कपिल शर्मा-इरफान खानला होऊ शकते ३ वर्षांची शिक्षा
3 मिलिंद सोमणच्या नावे अजून एक रेकॉर्ड