20 January 2018

News Flash

बॉलिवूड अभिनेत्रींच्या बॅगची किंमत कळल्यावर तुम्हालाही बसेल धक्का!

प्रियांका चोप्राकडे १०० पेक्षाही अधिक बॅग आहेत.

मुंबई | Updated: August 12, 2017 12:33 PM

दीपिका पदुकोण, करिना कपूर खान, प्रियांका चोप्रा

शौक बहुत बडी चीज होती है…. असं म्हणतात. पण, आवड ही महागसुद्धा असते हे आपल्याला बॉलिवूडकरांकडे पाहिल्यावर कळते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या आयफा सोहळ्यामध्ये निर्माता, दिग्दर्शक करण जोहर दीड लाखांची बॅग घेऊन पोहचला होता. पण, तुम्हाला माहितीये का, याहीपेक्षाही महागड्या बॅग्स बॉलिवूड अभिनेत्री वापरतात. आपल्या स्टाइल आणि फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्रींकडे अनेक ब्रॅण्ड्सच्या महागड्या बॅग आहेत. यामध्ये कोणाकडे आठ लाखांची तर कोणाकडे चार लाखांची बॅग असल्याचे दिसते.
नेहमीच आपल्याकडे लक्ष वेधण्यात यशस्वी राहणारी अभिनेत्री करिना कपूर खान हिच्याकडे आठ लाख रुपयांपेक्षाही महागडी बॅग आहे.

शॉपिंगची आवड असलेल्या करिनाकडे विविध ब्रॅण्डसच्या बऱ्याच बॅग्स आहेत. तिच्याकडे चॅनेल, बॉटटेगा, गॅवेन्ची या ब्रॅण्ड्सच्या बॅग आहेत. तसेच तिच्याकडे तब्बल ८.२६ लाख रुपये किंमत असलेली हर्म्स बर्किन एप्सॉम ब्रॅण्डचीही बॅग आहे.

बॉलिवूडच्या ‘मस्तानी’ला म्हणजेच दीपिका पदुकोणलाही करिनाप्रमाणे हर्म्स बर्किन एप्सॉम ब्रॅण्डच्या बॅगची आवड आहे. याव्यतिरीक्त तिच्याकडे गुसी, चॅनेल ब्रॅण्ड्सच्याही बॅग आहेत.

वाचा : ‘बिग बॉस ११’ मध्ये येण्यासाठी या हॉट अभिनेत्रीला चक्क २ कोटींची ऑफर

फॅशनिस्टा सोनम कपूरकडे अनेक महागड्या ब्रॅण्ड्सच्या बॅग आहेत. तिच्याकडे चार लाख रुपये किंमत असलेली चॅनेल या ब्रॅण्डची बॅग आहे. तसेच तिच्याकडे डायोर, पॉले का, बालेंसीगा, हर्मीस केली या ब्रॅण्डच्याही बॅग आहेत.

प्रियांका चोप्राकडे १०० पेक्षाही अधिक बॅग आहेत. यामध्ये तिला व्हॅलेंटिनो गरवानी रॉकस्टाड हा ब्रॅण्ड सर्वाधिक आवडतो. या ब्रॅण्डच्या बॅगची किंमत जवळपास सव्वा लाख रुपये आहे.

वाचा : आदिनाथ-उर्मिला कोठारेच्या घरी हलणार पाळणा

अनुष्का शर्माकडे अनेक ब्रॅण्ड्सच्या बॅग असून, तिला फेन्डी मॉन्सटर हा ब्रॅण्ड जास्त आवडतो. या ब्रॅण्डच्या बॅगची किंमत १.२ लाख रुपये इतकी आहे. तिच्याकडे टोट्स, अलेक्झांडर मॅक्वीन ब्रॅण्डच्या बॅगचेही कलेक्शन आहे.

शिल्पा शेट्टीकडे तीन लाख रुपये किंमत असलेली डायोर ब्रॅण्डची बॅग आहे. तसेच तिच्याकडे अलेक्झांडर मॅक्वीन ब्रॅण्डचीही बॅग असून त्याच्या किंमती ७० हजारपासून ते दोन लाखांपर्यंत आहे.

First Published on August 12, 2017 12:30 pm

Web Title: priyanka chopra kareena kapoor khan deepika padukone used expensive bags prize
  1. S
    S
    Aug 12, 2017 at 6:16 pm
    आणि याच देशातली एक सारिका झुटे कर्जबाजारी वडिलांवर पडणाऱ्या आपल्या लग्नाच्या बोज्याच्या काळजी ने आत्महत्या करते ..
    Reply