28 September 2020

News Flash

देसी गर्लसाठी निकने उचलला सिलेंडर, जाणून घ्या नेमकं काय झालं

हा किस्सा खुद्द प्रियांकाने एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि विदेशी गायक निक जोनास यांनी १ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. तर रविवारी २ डिसेंबर रोजी पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह संपन्न झाला. दोघांचे लग्न होऊन नऊ महिने उलटले असले तरी लग्नाच्या चर्चा कायम असल्याच्या पाहायला मिळताता. जोधपुरमधल्या आलिशान उमेद भवनमध्ये पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला निक आणि प्रियांकाचे जवळचे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. दरम्यान पाहुण्यांना फोन वापरण्यासही बंदी घातली होती. दोघांच्या लग्नानंतर प्रियांकाची बहिण परिणीती चोप्राकडून बरेच किस्से ऐकायला मिळाले होते. आता आणखी एक किस्सा समोर आला आहे. हा किस्सा खुद्द प्रियांकाने एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

प्रियांका सध्या तिचा आगामी चित्रपट ‘द स्काय इज पिंक’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियांका कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली होती. त्यावेळी तिने तिच्या लग्नातील किस्सा शेअर केला असल्याचे वृत्त मुंबई मिररने प्रसिद्ध केले आहे. देसी गर्लशी लग्न करण्यासाठी विदेशी बाबू निकला बराच घाम गाळावा लागल्याचे तिने सांगितले. इतकच नव्हे तर लग्न सोहळ्याची तयारी करताना निकला सिलिंडरसुद्धा उचलवा लागल्याचे देखील प्रियांकाने सांगितले आहे.

आणखी वाचा : प्रियांका चोप्राला आवडतात ‘हे’ दोन भारतीय क्रिकेटपटू

‘मला माझे लग्न धूमधडाक्यात करायचे होते म्हणून मी लग्नाआधी जवळपास १० दिवस भारतात परतले होते. त्यावेळी माझ्यासोबत निकसुद्धा भारतात आला होता. आमच्या लग्नाची तयारी करण्यासाठी त्याने प्रचंड मेहेनत घेतली इतकेच नव्हे तर त्याने एकदा गॅस सिलिंडरसुद्धा उचलला होता. भारतीय रिती-रिवाज हे निक आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी फार वेगळे होते. त्यामुळे मला लग्नात फार मज्जा आली’ असे प्रियांका म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 10:29 am

Web Title: priyanka chopra lifted cylinder in their wedding avb 95
Next Stories
1 बॉलिवूड कलाकारांनी आरे कारशेडला केला विरोध
2 Video : जेव्हा शाहरुख दूरदर्शनसाठी सुत्रसंचालन करायचा
3 ‘सेह लेंगे थोडा..’; बिग बॉसमधल्या ओव्हरअ‍ॅक्टिंगमुळे अमिषा ट्रोल
Just Now!
X