News Flash

‘फॅशन’मधील कंगना-प्रियांकाच्या भूमिका ‘या’ मॉडेल्सच्या आयुष्यावर आधारित

मधुर भांडारकरांच्या 'फॅशन' चित्रपटाविषयी काही रंजक गोष्टी

कलावंत ज्या समाजरचनेचा भाग असतो, त्या समाजाचे प्रतिबिंब त्यांच्या कलाकृतीत जाणते-अजाणतेपणी पडत असते. मात्र, आपल्या भवतालचा जाणीवपूर्वक अभ्यास करून सातत्याने तो आपल्या कलाकृतींतून मांडणारे कलावंत मोजकेच असतात. दिग्दर्शक मधुर भांडारकर हे आजच्या पिढीतलं अशांपैकी एक प्रमुख नाव. फॅशन जगतातील स्त्री-मॉडेल्सचं जगणं मधुर भांडारकरने ‘फॅशन’ या चित्रपटात दाखवलं आहे. रात्रीच्या पाटर्य़ामध्ये रमणारी माणसं दिवसा कोणत्या मानसिक ताणतणावांतून जात असतील? ‘फॅशन’च्या दुनियेमागचं अर्थकारण काय? ‘फॅशन’ची नायिका महिन्याभरात उच्चभ्रू वर्तुळात इतक्या सहजपणे कशी मिसळून जाते? तिला तिथे पोहोचण्यासाठी फार तडजोडी कराव्या लागत नाहीत का? ..असे अनेक प्रश्न हा चित्रपट पाहताना पडतात. या चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण झाली असून त्याविषयी काही रंजक माहिती जाणून घेऊयात..

– अभिनेत्री कंगना रणौतची भूमिका ही मॉडेल गीतांजली नागपालच्या आयुष्यावर आधारित असल्याचं म्हटलं जातं. मानसिक विकाराने ग्रस्त असलेली गीतांजली दिल्लीच्या रस्त्यावर भीक मागताना आढळली होती.

– चित्रपटातील एका दृश्यात रॅम्पवॉक करताना कंगनाचा टॉप खाली घसरतो. २०१६ मध्ये मुंबईत पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये कॅरोल ग्रेशिअससोबत असाच प्रसंगा घडला होता. त्यावरून ते दृश्य चित्रपटात दाखवण्यात आलं.

– या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. प्रियांकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, कंगनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा आणि मुख्य म्हणजे चित्रपटाला राष्ट्रीय व फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले.

– चित्रपटातील अरबाज खानच्या भूमिकेची ऑफर आधी सिद्धार्थ मल्होत्राला देण्यात आली होती. मात्र एका मॉडेलिंग एजन्सीशी करारबद्ध असल्याने त्याने ती ऑफर नाकारली होती.

– भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी कंगना आणि प्रियांकाला सेटवर अनेक सिगारेट ओढावे लागले होते असं म्हटलं जातं.

– प्रियांकाची व्यक्तीरेखा ही मॉडेल अलिशिया राऊतच्या आयुष्यावर आधारित असल्याचं समजतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 10:32 am

Web Title: priyanka chopra madhur bhandarkar kangana ranaut fashion lesser known facts ssv 92
Next Stories
1 राहुल वैद्य म्हणजे ‘बिग बॉस १४’ मधील कचरा; करण पटेलची टीका
2 ‘तेरी चोरिया’मध्ये नुशरत-राजकुमार रावचा रोमँण्टिक अंदाज, पाहा व्हिडीओ
3 जान कुमार सानूकडून महाराष्ट्राची माफी; मनसेनं दिला होता २४ तासांचा अल्टीमेटम
Just Now!
X