News Flash

झारखंडच्या मुलीला हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती; प्रियांका चोप्रा आणि नव्या नंदाने केलं कौतुक

"प्रेरणादायक कामगिरी.."

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतापासून दूर असली तरी भारतातील प्रत्येक घडामोडींची ती दखल घेत असते. नुकतीच प्रियांकाने भारतातील वाढत्या करोना रुग्णांची चिंता व्यक्त केली होती. यानंतर प्रियांकाने नुकतच एक ट्विट कर झारखंडमधील एका मुलीचं कौतुक केलं आहे. शुक्रवारी प्रियांकाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून झारखंडमधील एका खेड्यात राहणाऱ्य़ा सीमा नावाच्या मुलीचं कौतुक केलं आहे. मॅसेच्युसेट्स केंब्रिजमधील हार्वर्ड विद्यापीठात सीमाला शिष्यवृत्ती मिळाली आहे.

एवढचं नाही तर बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने देखील सीमाचं कौतुक केलं आहे. नव्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. शिवाय तिच्या ‘प्रोजेक्ट नवेली’ या माध्यमातून ती स्त्री-पुरुष समानता निर्माण करण्यासाठी काम करते.
प्रियांकाने युवा इंडियाची एक पोस्ट शेअर करत सीमाचं कौतुक केलंय. ती म्हणाली, “मुलीला शिक्षित करा आणि ती जग बदलू शकते..किती प्रेरणादायक कामगिरी..मस्तच सीमा.. तू पुढे काय करतेयस ते पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. ”

तर नव्याने देखील इन्स्टाग्रामवरील युवा इंडियाची पोस्ट तिच्या इन्सा स्टोरीला शेअर केली आहे. युवा इंडियाच्या या पोस्टमध्ये सीमाचे काही फोटो शेअर करण्यात आले असून तिचा खडतर प्रवास सांगत इतरांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

” सीमा झारखंडमधील उर्मांझीतील खेड्यातील असून तिचे आई-वडिल अशिक्षित आहेत. तिच वडिल एका धाग्याच्या कारखान्यात काम करतात. शेतीवर त्याचं थोडफार भागतं. २०१२ मध्ये युवा फुटबॉल संघात सामील झाल्यामुळे सीमाला बालविवाहा सारख्या प्रथेपासून दूर राहता आलं. तिने शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. फुटबॉल संघात सामिल झाल्यानंतर शॉर्ट पॅण्ट घातल्याने समाजात तिला टिकेला सामोरं जावं लागलं. विद्यापीठात जाणारी सीमा ही तिच्या कुटुंबातील पहिली मुलगी आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuwa (@yuwaindia)

या विद्यापीठात नेमक काय शिकणार हे ठाऊक नसलं तरी सीमाचं ध्येय ठरलं आहे. ती म्हणते “मला माझ्या गावात आणि संपूर्ण देशात लैगिंक समानता पाहयची आहे. लैंगिक भेदभाव, घरगुती हिंसाचार, बाल विवाह यारख्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी लैंगिक समानता आणणं आवश्यक आहे. माझ्या गावातील महिलांसाठी मी एक संस्था सुरू करण्याचा विचार करतेय.” असं सीमाचं म्हणणं आहे.
सीमाचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 2:14 pm

Web Title: priyanka chopra navya navel congratulate jharkhand girl who get harvard university scholarship kpw 89
Next Stories
1 एजाजबरोबर लग्न करताना धर्माची अडचण?; पवित्रा पुनिया म्हणते…
2 ‘लोकांकडे खायला अन्न नाही आणि..,’ मालदीवचे फोटो पोस्ट करणाऱ्या कलाकारांना नवाजचा टोला
3 ‘तुमच्या बऱ्याच चुका आहेत..,’ पंतप्रधानांनंतर कंगनाने अरविंद केजरीवाल यांना सुनावलं
Just Now!
X