News Flash

‘नेटफ्लिक्स’साठी प्रियांका चोप्रा होणार सुपरहिरो

प्रियांका चोप्रा नेटफ्लिक्सच्या आगामी वेब सीरिजमध्ये सुपरहिरो अवतारात झळकणार आहे.

परदेशी मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर आता देसी गर्ल प्रियांका चोप्राने आपले लक्ष वेब सीरिज दिशेने वळवले आहे. प्रियांका नेटफ्लिक्सच्या आगामी वेब सीरिजमध्ये सुपरहिरो अवतारात झळकणार आहे. विशेषत: लहान मुलांसाठी तयार केल्या जाणाऱ्या या सुपरहिरो मालिकेचे नाव वी कॅन बी हिरोज असे आहे. हॉलिवूड सिनेसृष्टीतील महागड्या दिग्दर्शकांपैकी एक रॉबर्ट रॉड्रिग्ज या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. सध्या या मालिकेच्या संकल्पनेवर काम सुरु आहे. तसेच प्रियांका चोप्राच्या भूमिकेबाबत नेटफ्लिक्सने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

रॉबर्ट रॉड्रिग्ज हे विशेषत: बालचित्रपटांचे निर्माते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर द अ‍ॅडवेंचर ऑफ शार्कबॉय, स्पाय किड्स, द फॅकल्टी, शॉर्ट्स यांसारख्या अनेक सुपरहिट बालपटांची निर्मिती केली आहे. त्यांनी नुकताच तयार केलेल्या अ‍ॅलिटा बॅटल एंजल या अॅनिमेशनपटाने तुफान लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळे चाहते आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात होते. रॉबर्ट रॉड्रिग्ज यांनी देखील या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु केले होते. परंतु ते अचानक थांबवून आता त्यांनी आपले लक्ष वी कॅन बी हिरोज या वेब मालिकेच्या दिशेने वळवले आहे.

याआधी सैफ अली खान, राधिका आपटे, आर. माधवन, अनुपम खेर, राजकुमार राव यांसारख्या अनेक मोठ्या बॉलिवूड कलाकारांनी वेब सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता चाहते प्रियांचा चोप्राच्या वेब पदार्पणाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 12:34 pm

Web Title: priyanka chopra netflix superhero robert rodriguez mpg 94
Next Stories
1 …म्हणून दीपिकाने घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय
2 इंदिरा गांधी यांच्यावर वेब सीरिज, ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका
3 स्पायडरमॅनची अ‍ॅव्हेंजर्समधून एक्झीट, जाणून घ्या कारण…
Just Now!
X