News Flash

होणाऱ्या नवऱ्यासाठी प्रियांकाची ‘Thanksgiving’ पार्टी

जोधपुरमधल्या उमेद भवन राजवाड्यामध्ये प्रियांका आणि निक लग्न करणार आहे.

nick jonas , priyanka chopra
प्रियांका चोप्रा, निक जोनास, nick jonas , priyanka chopra

ग्लोबल स्टार म्हणून नावारुपाला आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच विदेशी सून होणार आहे. येत्या ३० नोव्हेंबर रोजी ती अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच निक लग्नासाठी भारतात आला असून येथे त्यांनी पहिली ‘Thanksgiving’ पार्टी सेलिब्रेट केली. या पार्टीचे काही फोटो प्रियांकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

निक भारतात आल्यानंतर प्रियांकाने इन्स्टावर एक पोस्ट करत ‘Welcome home baby…’असं म्हणत त्याचं स्वागत केलं आहे. त्यानंतर प्रियांकाच्या संपूर्ण कुटूंबासोबत निकने डिनरला जात ‘Thanksgiving’ पार्टी सेलिब्रेट केली.

 

View this post on Instagram

 

Happy thanksgiving.. family.. forever..

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

दरम्यान, २०१७ पासून निक आणि प्रियांका एकमेकांना डेट करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच मुंबईत त्यांचा साखरपुडा पार पडला. मध्यंतरी निक आणि प्रियांकानं राजस्थानला भेट दिली होती. त्यानंतर इथल्याच राजमहालात विवाह करण्याचं दोघांनीही निश्चित केलं आहे. जोधपुरमधल्या उमेद भवन राजवाड्यामध्ये प्रियांका आणि निक लग्न करणार आहे. त्याआधी भारतीय पद्धतीनं मेहंदी, संगीत, हळद असे विधी होणार आहे. पण त्याचबरोबर ख्रिश्चनपद्धतीनंही विवाहसोहळा होणार आहे.

 

View this post on Instagram

 

Welcome home baby…

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 10:16 am

Web Title: priyanka chopra nick jonas celebrate thanksgiving india
Next Stories
1 The Lion King Trailer : ‘सिम्बा’ परत येतोय!
2 अभिनेत्री उदिता गोस्वामी झाली दुसऱ्यांदा आई !
3 Photo : अशी दिसते झलकारीबाईंच्या रुपात अंकिता
Just Now!
X