दीपिका-रणवीरनंतर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. बॉलिवूडमधल्या काही सुत्रांच्या माहितीनुसार २८ नोव्हेंबरपासून या विवाहसोहळ्याला सुरूवात होणार आहे तर २ डिसेंबरला राजस्थानमधल्या आलिशान महालात ते दोघंही विवाहबंधनात अडकणार आहे. यावरूनच प्रियांका आणि निकचा विवाहसोहळा हा राजेशाही थाटात पार पडणार हे नक्की!
या सोहळ्यासाठी प्रियांका निकनं कोट्यवधी रुपये खर्च केले असल्याचं म्हटलं जात आहे. ज्या ‘ताज उमेद महल पॅलेस’मध्ये हा सोहळा रंगणार आहे तिथे प्रियांका निकच्या पाहुण्यासाठी खास हॅलिपॅडची व्यवस्था करण्यात आली. २२ रुम्स आणि ४२ सूट्स असलेल्या या हॉटेलमध्ये प्रत्येक रुम्सचं एका दिवसांचं भाडं हे जवळपास ३४ हजार रुपयांच्या घरात असल्याचं समजत आहे. Conde Nast Traveller च्या माहितीनुसार इथल्या आलिशान रुम्सचं एकादिवसाचं भाडं हे ३४ ते पाच लाखांपर्यंत आहे. तर सर्वात आलिशान सूटचं एकादिवसाचं भाडं हे पाच लाखांहून अधिक आहे.
१ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत उमेद महलमध्ये एकही रुम राहण्यासाठी उपलब्ध नाही असं समजत आहे. याच दोन दिवसात या महालात प्रियांका निकचा आलिशान सोहळा रंगणार असल्याचं म्हटलं जात आहे. जवळपास २०० लोक या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित राहणार असून पारंपरिक भारतीय आणि मग ख्रिश्चन पद्धतीनं हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 10:32 am