06 July 2020

News Flash

दीप-वीरनंतर प्रियांकानं घेतला लग्नात मोबाइलवर बंदीचा निर्णय

प्रियांकानं आपल्या लग्नातील फोटोंचे हक्क एका मासिकाला कोट्यवधी किंमतीला विकले असल्याचं समजत आहे.

प्रियांका- निक जोनास

आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री लग्न करणार म्हणजे चाहत्यांमध्ये एक वेगळंच कुतूहल आनंद असतो. त्यांच्या लग्नातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून अनेक सेलिब्रिटी आपल्या लग्नाबद्दल कोणत्याची गोष्टी बाहेर येणार नाही याची पुरेपुर खबरदारी घेताना दिसत आहे. यात विराट अनुष्का, दीपिका-रणवीरसह अनेक सेलिब्रिटी जोडप्यांचा समावेश आहे. आता त्यांचंच अनुकरण करत प्रियांकानं देखील आपला सोहळा हा पूर्णपणे खासगी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जोधपुरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये सुरू असलेल्या या सोहळ्यातला कोणताही फोटो किंवा माहिती लीक होणार नाही याची पुरेपुरे काळजी प्रियांका आणि निकनं घेतली आहे. यासाठी लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना मोबाइल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या सोहळ्याची माहिती बाहेर कुठेही जाणार नाही याची हमी पाहुण्यांकडून घेण्यात आल्याचं समजत आहे.

लग्नासाठी अनेक हॉलिवूड स्टार उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सुरक्षाही कडक ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रियांका निकच्या लग्नातील फोटो पाहण्यास चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार हे नक्की. दरम्यान प्रियांकानं आपल्या लग्नातील फोटोंचे हक्क एका मासिकाला कोट्यवधी किंमतीला विकले असल्याचं समजत आहे. तिनं नुकताच एका मासिकाशी करार केला आहे. २.५ मिलिअन डॉलर म्हणजेच जवळपास १८ कोटी २६ लाखांचा हा करार असून लग्नातले खास फोटो केवळ या मासिकाकडे उपलब्ध असणार आहेत. या मासिकाकडे ते प्रसिद्ध करण्याचा हक्क असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 4:11 pm

Web Title: priyanka chopra nick jonas no mobile phones policy
टॅग Priyanka Chopra
Next Stories
1 Video : जेव्हा चाहताच सईसाठी ठरतो खलनायक
2 Video : असा तयार झाला दीपिका- रणवीरचा शाही पोशाख
3 ‘2.0’ने तिकीटबारीवर मोडला ‘बाहुबली’, ‘अॅव्हेंजर्स’चा हा विक्रम
Just Now!
X