13 December 2019

News Flash

फोटो काढण्याच्या गडबडीत प्रियांकाने केली ‘ही’ चूक, व्हायरल झाला फोटो

प्रियांकाला तिची चूक लक्षात देखील आली नाही

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडमधील देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता जागतिक स्तरावरील सेलिब्रिटी झाली आहे. हिंदी सिनेमापासून सुरु झालेला प्रियांकाचा प्रवास अगदी क्वांटिकोपर्यंत गेला आहे. त्यातच मागील वर्षी अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केल्यापासून ती अधिक काळ अमेरिकेत राहू लागली आहे. मात्र सध्या एका सीरिजच्या चित्रीकरणासाठी ती भारतात आली आहे. प्रियांका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. काही दिवसापूर्वीच प्रियांकाने तिच्या कुटुंबियांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. मात्र फोटो काढण्याच्या गडबडीमध्ये प्रियांकाने एक चूक केली. विशेष म्हणजे प्रियांकाला तिची चूक लक्षात देखील आली नाही. परंतु फोटो पाहिल्यानंतर तिला ही चूक उमगली.

प्रियांका सध्या तिच्या आईसोबत वेळ घालवत असून यावेळी तिने आईसोबत काही नातेवाईकांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला. मात्र हा फोटो नीट पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे प्रियांकाने एका पायामध्ये चप्पल घातलीच नव्हती. मात्र तरीदेखील तिने फोटो काढला. सध्या चाहत्यांमध्ये तिच्या या फोटोचीच चर्चा सुरु आहे. प्रियांका चप्पल घालायची विसरली की काय? असा प्रश्न चाहते प्रियांकाला विचारत आहेत.

वाचा : हर्मन बावेजाने सांगितलं प्रियांका चोप्राशी ब्रेकअप करण्यामागचं कारण

दरम्यान, प्रियांका लवकरच नेटफ्लिक्सवरील ‘द व्हाइट टायगर’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. सध्या या सीरिजच्या चित्रीकरणामध्ये ती व्यस्त आहे.

 

First Published on November 15, 2019 9:27 am

Web Title: priyanka chopra not wear sandals in her one leg photo goes viral ssj 93
Just Now!
X