News Flash

अभिनेत्रीसाठी प्रियांकाच्या घराची दारं खुली; देसी गर्लच्या ‘या’ घरात जॅकलीनचा नवा संसार

जॅकलीनने खरेदी केलं नवं घर?

आपल्या हक्काचं, स्वत:चं एक घर असावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यात बॉलिवूड कलाकारदेखील अपवाद नाहीत. या नवीन वर्षात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या नव्या घरात शिफ्ट झाले आहेत. यामध्येच आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सुद्धा तिच्या नव्या घरात शिफ्ट झाली आहे. विशेष म्हणजे जॅकलीन शिफ्ट झालेल्या घरात यापूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्रा राहत होती, असं ‘पिंकव्हिला’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून जॅकलीन मुंबईतील वांद्रे येथे राहत होती. मात्र, नवीन वर्षात तिने नव्या घरात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे जॅकलीनचं हे नवीन घर प्रचंड महाग असून ती या नव्या घरात भाडे तत्वावर राहत आहे.

जॅकलीनचं नवीन घर जुहू येथे असून कर्मयोग असं तिच्या इमारतीचं नाव आहे. या घरात पहिले प्रियांका चोप्रा तिच्या आई आणि भावासोबत राहत होती. प्रियांकाच लग्न झाल्यानंतर प्रियांका लॉस एन्जलिसला शिफ्ट झाली. तर, तिची आणि भाऊ यारी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले.
दरम्यान, जॅकलीन कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. लवकरच ती भूत पोलीस या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सैफ अली खान स्क्रीन शेअर करणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 11:50 am

Web Title: priyanka chopra old home will be jacqueline fernandez new home she shifted from bandra to juhu ssj 93
Next Stories
1 सनी लिओनीविरोधात केरळमध्ये तक्रार दाखल; ‘या’ प्रकरणाची चौकशी सुरू
2 Video : ‘चाहते माझं चित्र काढतात, पण…’
3 दयाचा नवा अवतार!
Just Now!
X