करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. परिणामी करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा विशेष काळजी घेत आहे. प्रियांकाला अस्थमा आहे त्यामुळे करोनावर लस येईपर्यंत ती आपल्या घरातच क्वारंटाईमध्ये राहणार आहे.

अवश्य पाहा – ‘रामायणात १४ वर्षांचा वनवास होतो अन् करोनात…’; अभिनेत्रीने मानले BMC चे आभार

ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने करोनावर भाष्य केलं. ती म्हणाली, “करोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. आम्ही करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी विशेष काळजी घेतोय. निकला मधुमेह आहे अन् मला अस्थमाचा त्रास जाणवतो. त्यामुळे बाहेरुन आणलेली प्रत्येक गोष्ट आम्ही योग्य प्रकारे सॅनिटाईज करतो. आम्ही गरज नसताना घराबाहेर पडत नाही. शिवाय आम्ही कामाच्या मिटिग्ससुद्ध फोन किंवा व्हिडीओ कॉलवरच करतोय. कामाच्या व्यापामुळे जे छंद जोपासायला वेळ मिळत नव्हता त्यांचा आनंद घेतोय. एकंदरी काय तर आम्ही लस येईपर्यंत क्वारंटाईनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे.”

अवश्य पाहा – बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; पूजा भट्टने देशवासीयांना केली मदतीची विनंती

संकट कायम! शंभर दिवसानंतर दुसऱ्यांदा होऊ शकतो करोना

भारतात करोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी १०० दिवस निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच रुग्ण एकदा करोनाच्या संसर्गातून बरा झाल्यानंतर त्याला १०० दिवसांनंतर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे, आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर देशात दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचे तीन रुग्ण आढळून आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भार्गव म्हणाले, “भारतात करोनाच्या पुनर्संसर्गासाठी १०० दिवसांचा कालावधी लागत आहे. हा कालावधी म्हणजे अँटिबॉडीजचं जीवनमान आहे. अशा प्रकारची पुनर्संसर्गाची भारतात तीन प्रकरणं समोर आली असून यांतील दोन रुग्ण मुंबईतील तर एक अहमदाबादमधील आहे. जागतीक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) जगात सुमारे दोन डझन पुनर्संसर्गाची प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान, आम्ही आयसीएमआरचा डेटा तपासत आहोत. तसेच पुनर्संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत.”